hc bans bheem army rally in pune | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

भीम आर्मीच्या पुण्यातील सभेला न्यायालयाची मनाई 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 31 डिसेंबर 2018

मुंबई : भीम आर्मीला पुण्यात जाहीर सभा घेण्यास मनाई करण्याच्या पुणे पोलिसांच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास सोमवारी (ता. 31) मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला. त्यामुळे भीम आर्मीला आता सभा घेता येणार नाही.
 
पुण्यात रविवार (ता. 30) आणि सोमवारी (ता. 31) एसएसपीएमएस महाविद्यालयाच्या प्रांगणात भीम आर्मीची सभा होणार होती. यात संघटनेचे प्रमुख चंद्रशेखर आझाद विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते; मात्र पुणे पोलिसांनी या सभांना परवानगी दिली नाही. त्यामुळे संघटनेच्या पुणे विभागाचे प्रमुख दत्ता पोळ यांनी न्यायालयाकडे याचिका केली होती.

सुटीकालीन न्या. सी. व्ही. भडंग यांच्यापुढे याचिकेवर तातडीने सुनावणी झाली. पुणे पोलिसांनी कार्यकर्त्यांवरही कारवाई केली आणि त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन केले, त्यामुळे पोलिसांवर कारवाई करण्याची मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. 

सभेला विद्यापीठाने परवानगी नाकारली आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. तसेच, आझाद यांना कोणत्याही प्रकारे नजरकैदेत किंवा अटकेत ठेवले नसल्याचेही या वेळी सांगण्यात आले. पुण्यातील कोरेगाव भीमामध्ये ते जाऊ शकतात, असेही या वेळी स्पष्ट करण्यात आले. सभेला परवानगी न देण्याच्या पोलिसांच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाने नकार दिला; मात्र पुणे पोलिसांनी याचिकेतील आरोपांबाबत चार जानेवारीपर्यंत लेखी भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले. 

संबंधित लेख