in hatakalangne give ticket to jayant patil, dhairyashil mane | Sarkarnama

हातकणंगलेसाठी जयंत पाटलांना उमेदवारी द्या? : माने 

सदानंद पाटील 
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना उमेदवारी द्यावी ,अशी मागणी माजी खासदार निवेदिता माने व धैर्यशील माने यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. 

ही मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच करण्यात आली. त्यामुळे पाटील हे देखील बुचकळ्यात पडले. माजी खासदार निवेदिता माने व त्यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीची मागणी केली

.खासदार राजू शेट्टी यांच्या बरोबर फार जवळीक करू नका. त्यांनी राष्ट्रवादीला खूप अडचणीत आणले आले आहे. जर आम्हाला तिकीट मिळत नसेल तर ते आवाडे यांना देण्यात यावे.त्यांनाही उमेदवारी मिळणार नसेल तर ही उमेदवारी जयंत पाटील यांना द्यावी ,अशी मागणी माने यांनी पवार यांच्याकडे केली. या मागणीवर आमदार पाटील यांनी फक्त स्मित हास्य केले. 

संबंधित लेख