haseen janha in congress | Sarkarnama

क्रिकेटपटू शमींच्या पत्नी हसीन जहॉं यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

मुंबई : भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू मोहम्मद शमी यांच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध मॉडेल हसीन जहॉं यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. 

मुंबई : भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटू मोहम्मद शमी यांच्या पत्नी आणि सुप्रसिद्ध मॉडेल हसीन जहॉं यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. 

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी त्यांचे कॉंग्रेस पक्षामध्ये स्वागत केले. जहॉं यांनी काही महिन्यापूर्वी मोहम्मद यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेऊन दहा लाख रुपये महिन्याला देण्याची मागणी केली होती. आपला आणि मुलीच्या खर्चासाठी ही मागणी केली होती. या दोघांमधील मतभेद विकोपाला गेले होते. मोहम्मद यांनी आपल्या जिवीतास जहॉं यांच्याकडून धोका असल्याचे म्हटले होते. दोघांमध्ये समेट होईल असे वाटत होते. पण, भांडण मिटले नाही. 
आज हे दांम्पत्य विभक्त झाले आहे. 

जहॉं यांनी आज अचानक कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होती. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख