Hasan Musriff to sue Mahadeorao Mahadik for defamation | Sarkarnama

हसन मुश्रीफ करणार महादेवराव  महाडिकांवर 10 कोटींचा दावा 

सदानंद पाटील 
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

गोकुळ मल्टीस्टेटवरुन महाडिक-वाद विकोपाला गेला आहे. दोघांकडूनही मल्टीस्टेटच्या काळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यावेळी महाडिक यांनी थेट जिल्हा बॅंक, मुश्रीफ यांना टार्गेट केले.

कोल्हापूर : जिल्हा बॅंकेच्या संचालकांची बदनामी केल्याप्रकरणी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यावर 10 कोटींचा बदनामीचा खटला दाखल करणार असल्याची माहिती, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हयातील राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांसह खासदार धनंजय महाडिक हे देखील उपस्थित होते. 

आमदार मुश्रीफ म्हणाले, महाडिक यांनी जिल्हा बॅंकेच्या संचालकांवर चुकीचे आरोप केले. याबददल आपण यापूर्वीच 5 कोटींचा दावा दाखल करण्याचे नियोजन केले होते. मात्र संचालकांनी देखील महाडिक यांच्या या आरोपाला विरोध करत त्याचा निषेध केला आहे. 

आता संचालक मंडळाकडून महाडिकांवर 10 कोटींचा बदनामीचा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती आमदार मुश्रीफ यांनी दिली. तसेच याबाबत दोन दिवसात विस्तृत माहिती दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

गोकुळ मल्टीस्टेटवरुन महाडिक-वाद विकोपाला गेला आहे. दोघांकडूनही मल्टीस्टेटच्या काळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. यावेळी महाडिक यांनी थेट जिल्हा बॅंक, मुश्रीफ यांना टार्गेट केले.

जिल्हा बॅंक चांगली चालल्याबददल आमदार मुश्रीफ यांनी संचालकांना दुबईवारी घडवून आणली. मात्र ही दुबईवारी एका कंपनीकडून स्पॉन्सर करण्यात आली होती, असा आरोप महाडिक यांनी केला होता.

तसेच दुबईत काही संचालकांनी बारमध्ये गोंधळ घातल्याचाही आरोप केला होता. दुबई प्रमाणेच बेंगलोर येथेही काही संचालकांनी धिंगाणा घातला होता, असा आरोप केला होता. या आरोपांबददल हा बदनामीचा दावा दाखल केला जाणार आहे.  

संबंधित लेख