hasan mushriff questions mahadeorao mahadik about gokul | Sarkarnama

गोकुळमधील माझा वाटा कुठाय ? : मुश्रीफ 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 जुलै 2018

गोकुळ दूध संघाच्या सत्तेत मी सहकारी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मला नोकर भरतीत वाटाच मिळाला नसल्याचा टोला, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी महादेवराव महाडिक यांना लगावला.

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या सत्तेत मी सहकारी असल्याचे सांगितले जात आहे. मात्र मला नोकर भरतीत वाटाच मिळाला नसल्याचा टोला, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी महादेवराव महाडिक यांना लगावला. तसेच महाडिक हे जिल्ह्यातील दुसरे मुक्‍त विद्यापीठ असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

आमदार मुश्रीफ म्हणाले, गोकुळ दूध संघ हा जिल्हा दूध संघ आहे. तो मल्टीस्टेट करता येणार नाही. तरीही तसा घाट घातला जात आहे. त्याला आपण विरोध करणार आहे. गोकुळ मल्टीस्टेट करणार असल्याचे संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यांना हा विषय सर्वसाधारण सभेत घ्यावा लागणार आहे. हा विषय सभेत आला तर आपण या सभेला जाणार असून या प्रश्‍नी आपला आमदार सतेज पाटील यांना पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख