hasan mushriff press about meyor election | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

जय पराजय मान्य आहे; पण हा प्रकार कोल्हापूरची जनता मान्य करणार नाही!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

चंद्रकातदादांचे नाव 'नोबेल पारितोषिका'साठी पाठवा : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : महापौर-उपमहापौर निवडणूक सोमवारी (ता.10) होणार आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीत न्यायालयाव्यतिरिक्त कोणीही नगरसेवकांना मतदान करण्यापासून रोखू शकत नाही, असे  राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी आज सायंकाळी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

नगरसेवक अपात्र झाल्याच्या बातम्या वृत्तवाहिन्यांवर येत आहेत. त्या संदर्भात मंत्रालयात युद्घपातळीवर तयारी सुरू आहे, त्यामुळे ही पत्रकार परिषद घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

जय पराजय मान्य आहे; पण हा प्रकार कोल्हापूरची जनता मान्य करणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर राहील, असाही इशारा आमदार मुश्रीफ यांनी दिला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पोवार, स्वीकृत नगरसेवक जयंत पाटील यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते. 

मुश्रीफ म्हणाले, "नगरसेविका सरिता मोरे महापौर पदाच्या उमेदवार आहेत. निवडणूक प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. कोणत्याही स्थितीत ही निवडणूक प्रक्रीया थांबविता येणार नाही. आज दुपारी टीव्हीवर नगरसेवक अपात्रतेबाबत बातमी दाखविली. त्यानंतर हालचाली सुरू झाल्या. अनेकांचे फोन आले. आम्ही माहिती घेतली तेव्हा याबाबतची माहिती पुढे आली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जे नगरसेवक प्रेमाने येतील त्यांचे स्वागत करा, असे सांगितल्याचे वृत्तपत्रांतून वाचले. त्यांचे मी स्वागत करतो. यासाठी त्यांचे नाव नोबेल पारितोषिकासाठी पाठवावे, असे मला वाटते. सत्तेसाठी लाचार झालेल्या अधिकाऱ्यांनी जातपडताळणीचा खेळ सुरू केला आहे. ते कायद्याच्या चिंध्या उडवत आहेत. अशा अधिकाऱ्यांना भविष्यात जाब द्यावा लागणार आहे. सत्ता येते जाते. त्याला कोणीही रोखू शकत नाही. आणि महापौर-उपमहापौर निवडीत नगरसेवकांना मतदानापासून कोणीही रोखू शकणार नाही.'' 

संबंधित लेख