Hasan Mushriff makes allegations against Gokul directors | Sarkarnama

दहा-वीस लाख घेवून गोकुळमध्ये नोकरभरती  :  हसन मुश्रीफ यांचा आरोप 

सुनील पाटील 
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघात (गोकुळ) दहा-वीस लाख घेवून नोकर भरती करण्यापलिकडे विद्यमान संचालकांनी काहीही केलेले नाही.

-हसन मुश्रीफ

कोल्हापूर  : "कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध संघात (गोकुळ) दहा-वीस लाख घेवून नोकर भरती करण्यापलिकडे विद्यमान संचालकांनी काहीही केलेले नाही. त्यामुळे जिल्ह्याचा दूध संघ म्हणून नोंद असणारा गोकुळ मल्टिस्टेट करण्याचा घाट घातला जात आहे ,"असा आरोप   आमदार हसन मुश्रीफ यांनीकेला आहे . 

 गोकुळचे संचालक रणजीत पाटील यांनी सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना मल्टीस्टेट कसा काढला?  मग गोकुळ विरोध का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्याला श्री मुश्रीफ यांनी उत्तर दिले. 

आमदार मुश्रीफ म्हणाले, "गोकुळ मल्टिस्टेट करण्याला शेतकरी आणि सभासदांचा विरोध आहे. हाच मुद्दा घेवून आपण सभा घेत आहोत. मुळात संचालक रणजीत पाटील यांच्या सर्वात कमी दूध संस्था आहेत. तरीही ते सर्वात जास्त भाग्यवान संचालक ठरले आहेत. श्री पाटील यांनी संताजी घोरपडे मल्टिस्टेट का केला असा हास्यास्पद प्रश्‍न केला आहे."

"  त्यांना राज्यात सहकारी साखर कारखाना काढण्यासाठी बंदी आहे. हे माहिती नाही की काय? सहकारी कारखान्याला बंदी असल्याने शेतकऱ्यांच्या सहकार्याने, जाहीर सभा घेऊन, तसेच शेतकऱ्यांची मान्यता घेवून तसेच सर्व मदत घेऊन मुळातच पब्लिक लिमिटेड कारखाना काढला आहे. सहकारी नोंदणी झालेला व स्वतःच्या स्वार्थासाठी आयुष्यभर ताब्यात ठेवण्यासाठी पोटनियम दुरुस्ती आम्ही केलेली नाही. " असेही ते म्हणाले . 

" बेडकिहाळचा कारखाना श्री महाडिक यांनी खाजगी तत्त्वावर काढला, त्याबद्दल आमची तक्रार असणार नाही ती त्यांची व्यक्तिगत मालमत्ता आहे. श्री रणजीत पाटील यांनी भडगाव येथे हरिप्रिया मसाले व चटणीचा कारखाना खाजगी चालवला. तोट्यात आल्यानंतर विकून टाकला. हेही श्री पाटील यांनी जाहीर करावे."' असा टोलाही महाडिक यांनी लगावला .  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख