hasan mushriff angrey | Sarkarnama

कागलला डावलल्याने हसन मुश्रीफ संतापले; मनीषा म्हैसकरांकडे तक्रार 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर स्पर्धेचे सर्वेक्षण करणाऱ्या करणाऱ्या त्रयस्थ एजन्सीने घोटाळा केल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे. 

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर स्पर्धेचे सर्वेक्षण करणाऱ्या करणाऱ्या त्रयस्थ एजन्सीने घोटाळा केल्याचा आरोप आमदार हसन मुश्रीफ यांनी केला आहे. 

मुश्रीफ म्हणाले, ज्या महानगरपालिका, नगरपालिकांनी सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेचा हात ओले केले त्यांनाच नंबर दिले गेले. या स्पर्धेत भाजपने त्यांना हव्या त्या नगरपालिका आणि महानगरपालिका ठरवून निवडल्या आहेत. ज्यांचे नंबर आले आहेत आणि जे स्पर्धेत आहेत अशा सर्व महापालिका आणि नगरपालिका यांची फेर चौकशी करावी म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, असे त्यांनी सांगितले. 

कागल नगरपरिषदेने आवश्‍यक ते सर्व निकष पूर्ण केले आहेत. ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारी ही देशातील एकमेव नगरपालिका असताना तिला डावलल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला केला. तसेच याबाबत आयुक्त मनीषा म्हैसकर यांच्याकडे तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले त्यांनी सांगितले. 

संबंधित लेख