hasan mushrif and sugar factory | Sarkarnama

आमदार मुश्रीफांची प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात धडक, कारवाईला आक्षेप

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांचा सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना बंद करण्याचे आदेश प्रदुषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नागेश लोहळकर यांनी दिले आहेत. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केलेल्या तक्रारी नंतर लोहळकर यांनी ही जल प्रदूषण कायदा 1974 कलम 33 अ नुसार कारवाई करत असल्याचे सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळ ही कारवाई करत असल्याची माहिती समजताच आमदार मुश्रीफ यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. 

दोन दिवसांपूर्वी बेलेवाडी काळम्मा ग्रामस्थांनी दूषित पाणी आल्याच्या कारणावरून रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते. यावेळी आमदार मुश्रीफ यांच्या दिशेने पाण्याच्या घागरी फेकण्यात आल्या. यावेळी कारखान्याचे कामगार आणि ग्रामस्थ यांच्यात बाचाबाची होऊन त्याचे पर्यावसान वादात झाले. त्या वेळी ग्रामस्थांनी पाण्याने भरलेल्या घागरी कामगारांच्या दिशेने फेकण्यात आल्या. दरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, संजय पवार यांनी कारखाना परिसरातील पाण्याची चाचणी पाटबंधारे विभागामार्फत घेऊन ते प्रदूषण नियंत्रण विभागाला देण्यात आले. 

शिवसेना शिष्टमंडळ व पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदन व अहवालाच्या आधारे कारखाना बंद करण्याचे आदेश देत असल्याचे लोहळकर यांनी दिले. दरम्यान आमदार मुश्रीफ याना कारवाईची माहिती समजताच त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात धडक दिली. जर घोरपडे कारखान्यावर कारवाई करणार असाल तर जिल्ह्यातील सर्व कारखान्यावर कारवाई करावी लागेल, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला. 

संबंधित लेख