hasan mushrif and patil | Sarkarnama

रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल आमदार मुश्रीफांनी केला चंद्रकांतदादांचा धिक्‍कार

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

कोल्हापूर : गेल्या साडेचार वर्षात युतीचे शासन आल्यापासून सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रस्त्यांची पुरती वाट लावली आहे. कागल, चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे विरोधी पक्षाचे असल्याने या रस्त्यांकडे दुर्लक्ष केले जात असून त्यास मंत्री चंद्रकांतदादाच जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी यावेळी मंत्री पाटील यांचा धिक्‍कार केला. यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकरही उपस्थित होत्या. 

कागल, चंदगड विधानसभा मतदारसंघासह एकूणच राज्यात रस्त्यांची फारच वाईट दुर्दशा झाली आहे. त्यामुळेच हजारो लोकांना रस्ते अपघातात आपला हकनाक जीव गमवावा लागला आहे. काहींना आजीवन अपंगत्व आले आहे. तरीही सरकार जनतेच्या जीवाशी राजरोस खेळतच आहे. कागल व चंदगड विधानसभा मतदारसंघातील रस्ते तर अत्यंत खराब झाले आहेत. या दोन्ही मतदारसंघात विरोधी आमदार असल्यामुळेच सरकारने निधी देण्यात दुजाभाव केला आहे. रस्त्यांची दुर्दशा झाल्याचा आरोपही आमदार श्री. मुश्रीफ यांनी केला. यावेळी विकासकामांना निधी न देणाऱ्या राज्य सरकारचा त्यांनी धिक्कार केला. 

यावेळी श्री. मुश्रीफ व आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी कागल व चंदगड मतदार संघातील खड्ड्यांचे छायाचित्र असलेला फलक हाती धरला होता. त्यावर खड्डेच खड्डे चोहीकडे मग रस्ते गेली कुणीकडे ? असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. हे रस्त्यातील खड्डे नव्हेत तर हे आहेत खड्ड्यातील रस्ते, असा उपरोधात्मक टोलाही त्यांनी यावेळी लावला. 

संबंधित लेख