कार्यकर्त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी धावले हर्षवर्धन पाटील

कार्यकर्त्याच्या कुटुंबाच्या मदतीसाठी धावले हर्षवर्धन पाटील

"शेटफळगढे : त्याने आख्खे आयुष्य पक्षकार्यात घालवले. त्याच्यासारखा निष्ठावंत कार्यकर्ता शोधूनही सापडणार नाही, असेच सारे म्हणायचे. मात्र अचानकच तो गेला आणि त्याच्यानंतर त्याच्या कुटुंबाने करायचे काय, हा प्रश्‍न पडला. आता भाजीतल्या कडीपत्त्याप्रमाणे नेते काम झाले की कार्यकर्त्याला फेकून देतात, अशीही चर्चा सुरू झाली...


मात्र गेल्या वीस वर्षात सावलीप्रमाणे साथसोबत केलेल्या कार्यकर्त्यांसाठी हर्षवर्धन पाटील यांनीही त्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही हा शब्द दिला आणि तो पाळताना म्हसोबावाडीतल्या प्रमोद चांदगुडे यांच्या कुटुंबीयांना पाटील यांनी पाच लाख रूपयांची मदत केली.
 
प्रमोद चांदगुडे यांच्या अकाली जाण्यानंतर झालेली ही मदत म्हणजे पक्षकार्यासाठी जीव ओतून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी एक आशेचा किरणच ठरली आहे. पक्ष कधीच वाऱ्यावर सोडत नाही आणि नेताही हा संदेश या घटनेने दिला. नुकतेच हर्षवर्धन पाटील यांनी चांदगुडे यांच्या कुटुंबीयांकडे ही मदत सुपूर्त केली.

यावेळी यशवंतराय मंदीरात आयोजित कार्यक्रमात पाटील म्हणाले, " कार्यकर्त्याच्या जोरावर पक्षाची वाटचाल चालू असते. त्यामुळे सुख दुःखात कार्यकर्त्याच्या मागे उभे राहणे हे नेत्यांचे कर्तव्य असते. त्यामुळे कार्यकर्त्यावर कसलीही वेळ आल्यास आपण कार्यकर्त्याच्या व त्यांच्या कुंटूबीयांच्या पाठीशी कायमच खंबीरपणे मागे उभा राहत असतो. असे सांगत पाटील पुढे म्हणाले, " प्रमोद चांदगुडे हा पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता होता.. त्याच्या अचानक जाण्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कुंटुंबीयांना या मदतीबरोबरच यापुढील काळातही सर्वतोपरी मदत आपण करणार आहे. तसेच मुलांच्या शिक्षणासाठीही सहकार्य करणार आहे. असे पाटील यांनी सांगितले.
 
यावेळी भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद गटातील कॉग्रेस कार्यकर्त्यांना चांदगुडे यांच्या कुंटूबीयांना आणखी मदत करण्याच्या सूचना पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. यावेळी युवक तालुकाध्यक्ष हनुमंत काजळे पाटील , दत्तात्रेय वणवे , रामभाऊ काजळे पाटील , नवनाथ बागल , संतोष शिंदे , गणेश खाडे , ब्रम्हदेव केकाण यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com