harshwardhan patil birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्याच्या राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, आधुनिक काळाची जाणीव, शेती प्रश्नांसह इतर सामाजिक प्रश्नांचा अभ्यास, सजग लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा लौकीक आहे.

वयाच्या 22 व्या वर्षी हर्षवर्धन पाटील यांनी शिवामृत दूध संघाच्या माध्यमातून संचालकपदावर काम करण्यास सुरवात केली. 1995 साली अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेची निवडणूक लढवून ते भरघोस मतांनी विजयी झाले. समाजामध्ये राजबिंडे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची नवीन ओळख सुरू झाली.

(स्वर्गीय) शंकरराव पाटील भाऊंच्या कार्याचा वारसा व इंदापूर येथील जनतेच्या आशीर्वादामुळे राज्यातील अपक्ष आमदारांचे गटनेते झाले. व युतीच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. 1999 ते 2009 पर्यंतच्या निवडणुकीमध्ये सहज विजय मिळवला.  राज्यातील सहा मुख्यमंत्र्यांच्या समवेत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांची खास मैत्री होती.

इंदापूर तालुक्यातील अनेक प्रश्न त्यांनी सोडविले. राजकीयदृष्ट्या घराण्याची परंपरा होती तरी संघर्षही तितकाच त्यांना करावा लागला. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीत किंवा भांडणात अनेकदा इंदापूर हा मतदारसंघ केंद्रस्थानी असल्याचे या पूर्वी घडले आहे. त्यामुळे आगामी २०१९ ची विधानसभा निवडणूक पाटलांसाठी मह्त्त्वाची आहे.  

संबंधित लेख