Harshwardhan Jadhav Says Hi will not give ticket to his Wife | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

पत्नीला विधानसभेची उमेदवारी द्यायला मी अशोक चव्हाण आहे का? : हर्षवर्धन जाधव 

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 30 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : "घरात फक्त एकाच व्यक्तीने राजकारण करायच हे आमच ठरलं आहे, मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्यामुळे कन्नड विधानसभेची उमेदवारी पत्नी संजना जाधव यांना देणार अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. पण त्यात काही तथ्य नाही, मी लोकसभा लढवणार असलो तरी पत्नीला विधानसभेची उमेदवारी देणार नाही. मी काय अशोक चव्हाण आहे का?," असा टोला लगावतांनाच पत्नीच्या उमेदवारी वरून सुरु असलेल्या चर्चेला आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 'सरकारनामा'शी बोलताना पूर्णविराम दिला. 

'शिवस्वराज्य बहुजन पक्ष' या संभाव्य नावाचा पक्ष काढण्याची कन्नड-सोयगांव मतदारसंघाचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नुकतीच घोषणा केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात लढणार असल्याचे देखील जाहीर केले. 

या पार्श्‍वभूमीवर हर्षवर्धन जाधव कन्नडमधून आपल्या पत्नी व माजी जिल्हा परिषद सदस्य संजना जाधव यांना उमेदवारी देणार असल्याची जोरदार चर्चा तालुक्‍यात आणि त्यांच्या समर्थकांमध्ये सुरू आहे. नव्या पक्षाची घोषणा करण्यासाठी घेण्यात आलेल्या चिंतन बैठकीच्या वेळी देखील व्यासपीठावर संजना जाधव यांची उपस्थिती असल्याने हर्षवर्धन जाधव यांनी लोकसभा निवडणूक लढवली तर कन्नडची जबादारी त्यांच्या पत्नीवर टाकली जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. 

या संदर्भात आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशी कुठली शक्‍यता नसल्याचे स्पष्ट केले. "आमच्या घरात एकाच व्यक्तीने राजकारण करायचे हे ठरले आहे. पत्नीला राजकारणात आणून किंवा निवडणुकीत उतरवून मी घर वाऱ्यावर सोडू इच्छित नाही. कन्नड विधानसभेच्या उमेदवारीचा विषय झाला तेव्हा यावर आमची सविस्त चर्चा झाली आहे. पत्नी संजना यांची देखील माझ्या निर्णयाला संमती आहे,'' असे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. 

मग उमेदवारी कुणाला?
कन्नड विधानसभेची उमेदवारी मग कुणाला मिळणार यावर देखील हर्षवर्धन यांनी खुलासा केला. ''विरोधी पक्षातील अनेक तालुक्‍यांतील नेते माझ्या संपर्कात आहेत. माझ्या नव्या पक्षाकडून निवडणूक लढवण्याची इच्छा अनेकांनी बोलून दाखवली आहे. मी ही त्यांना माझे विचार तुम्हाला पटत असले, तर निश्‍चित तुमचे स्वागत आणि उमेदवारी देताना तुमचा विचार केला जाईल असे सांगितले आहे." अशी माहिती जाधव यांनी दिली.

संबंधित लेख