Harshwardhan Jadhav Bacchu Kadu Secret Meet | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

सासऱ्यांच्या विरोधात लढणाऱ्या बच्चू कडूंशी हर्षवर्धन जाधव यांची हातमिळवणी? 

जगदीश पानसरे 
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात सर्वप्रथम हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा करून त्यांनी जिल्हाभरात दौरै सुरू केले आहेत. 18 ऑक्‍टोबर म्हणजेच विजया दशमीच्या दिवशी जाधव आपल्या शिवस्वराज्य बहुजन पक्ष या पक्षाचे संपर्क कार्यालय शहरात सुरू करणार आहेत.

औरंगाबादः शिवस्वराज्य बहुजन पक्षाची दसऱ्याला मुर्हूतावर मर्हुतमेढ रोवण्याच्या तयारीत असलेले शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबाद मुक्कामी असलेल्या प्रहार शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांची आधी सुभेदारी विश्रामगृह आणि नंतर हॉटेल ताज मध्ये जाऊन रविवारी (ता. 14) रात्री गुप्त भेट घेतल्याने खळबळ उडाली आहे. 

विशेष म्हणजे बच्चू कडू यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव यांचे सासरे भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांना आव्हान दिले आहे. कुठल्याही परिस्थितीत दानवेंच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना चारीमुंड्या चीत करण्याचा विडाच कडू यांनी उचलला आहे. अशावेळी हर्षवर्धन जाधव यांनी बच्चू कडू यांची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात सर्वप्रथम हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा करून त्यांनी जिल्हाभरात दौरै सुरू केले आहेत. 18 ऑक्‍टोबर म्हणजेच विजया दशमीच्या दिवशी जाधव आपल्या शिवस्वराज्य बहुजन पक्ष या पक्षाचे संपर्क कार्यालय शहरात सुरू करणार आहेत. कन्नड-सोयंगाव विधानसभा निवडणूक न लढवता, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादमधून शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात लढण्याची घोषणा हर्षवर्धन जाधव यांनी नुकतीच केली होती. जिल्हाभरात त्यांनी तशी तयारी देखील सुरू केली आहे. 

बच्चू कडूंकडे पाठिंब्याची मागणी का?
जालना लोकसभा मतदारसंघातून रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर बच्चू कडू यांचे देखील मतदारसंघात दौरे वाढले आहेत. रविवारी जालन्यातील कार्यक्रम आटोपल्यानंतर ते औरंगाबादेत मुक्कामी आले होते. बच्चू कडू सुभेदारी विश्रामगृहात कार्यकर्त्यांची बैठक घेत असतांना आमदार हर्षवर्धन जाधव सुभेदारीवर पोहचले आणि त्यांनी भेटण्यासाठी आलो आहे, अशी चिठ्ठी बच्चू कडू यांच्याकडे पाठवली. 

कार्यकर्त्यांची बैठक सुरू असल्यामुळे साधरणता दहा-पंधरा मिनिटांनी बच्चू कडू यांनी जाधव यांना आत बोलावले. पण कार्यकर्त्यांचा गराडा असल्यामुळे तिथे औपचारिक गप्पाशिवाय कुठलीच राजकीय चर्चा झाली नाही. तिथून निघाल्यानंतर हर्षवर्धन जाधव बच्चू कडू मुक्कामी थांबलेल्या हॉटेल ताजमध्ये त्यांना भेटण्यासाठी गेले. रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान, या दोघांमघ्ये पंधरा-वीस मिनिटे गुप्त चर्चा झाली. 

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत बच्चू कडू व त्यांच्या प्रहार संघटनेने आपल्या पाठिंबा द्यावा व मदत करावी अस सांकड घालण्यासाठी हर्षवर्धन जाधव गेले होते अशी माहिती हाती आली आहे. एकीकडे जाधव यांचे सासरे खासदार रावसाहेब दानवे यांना पराभूत करण्यासाठी बच्चू कडू व त्यांची राज्यभरातील प्रहार संघटना एकवटली असतांना त्याच बच्चू कडू यांची हर्षवर्धन जाधव यांनी भेट घेतल्याने वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे. 

ते पाठिंब्यासाठीच आले असावेत- बच्चू कडू
हर्षवर्धन जाधव यांची आणि माझी रात्री भेट झाल्याचे आमदार बच्चू कडू यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले. दहा-पंधरा मिनिटांच्या भेटीत फारशी राजकीय चर्चा झाली नाही. पण ते औरंगाबादेतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्यामुळे आमची जी काही ताकद शहर आणि जिल्ह्यात आहे ती त्यांच्या पाठीशी आम्ही उभी करावी अशी त्यांची बहुदा अपेक्षा होती. यावर विधानसभा अधिववेशनाच्या वेळी आपण मुंबईत भेटू आणि बोलू असे मी त्यांना सांगितले असल्याचे बच्चू कडू म्हणाले. 

संबंधित लेख