harshwardhan jadhav and state | Sarkarnama

मराठा आरक्षणाचा अध्यादेश न काढणारे राज्य सरकार बरखास्त करा - हर्षवर्धन जाधव

जगदीश पानसरे
सोमवार, 30 जुलै 2018

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी रोज तरूण आपला जीव देतायेत, अध्यादेश काढणे सरकारला सहज शक्‍य असतांना ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. सध्या ऍक्‍शन घेण्याची वेळ आहे, पण सरकारकडून नुसताच टाईमपास सुरू आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यास हे सरकार टाळाटाळ करत असल्यामुळे ते बरखास्त करा अशी मागणी आपण राज्यपालांकडे केली असल्याचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी " सरकारनामा' शी बोलतांना सांगितले. 

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी रोज तरूण आपला जीव देतायेत, अध्यादेश काढणे सरकारला सहज शक्‍य असतांना ते याकडे दुर्लक्ष करत आहेत. सध्या ऍक्‍शन घेण्याची वेळ आहे, पण सरकारकडून नुसताच टाईमपास सुरू आहे. मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यास हे सरकार टाळाटाळ करत असल्यामुळे ते बरखास्त करा अशी मागणी आपण राज्यपालांकडे केली असल्याचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी " सरकारनामा' शी बोलतांना सांगितले. 

मराठा आरक्षणावर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज (ता. 31) मुंबईत पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला हजर राहण्यासाठी कन्नड-सोयगांवचे शिवेसना आमदार हर्षवर्धन जाधव गेले होते. बैठक सुरू होण्यापुर्वीच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादेत आणखी एका तरुणाने जीव दिल्याचे मला कळाले आणि आपण उद्विग्न झालो. त्यामुळे बैठकीच्या नियोजित वेळेआधीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांना फोन करून तातडीने अध्यादेश काढण्याची विनंती मी त्यांच्याकडे करणार होतो. पण माझी उध्दव ठाकरे यांच्याशी भेट होऊ शकली नाही. 

मुख्यमंत्र्यांना फोन... 
पक्षप्रमुखांची भेट न झाल्यामुळे थेट मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. राज्यात मराठा तरूण मराठा आरक्षणासाठी जीव देत आहेत. तेव्हा आता आणखी उशीर न करता तात्काळ अध्यादेश काढा अशी विनंती त्यांना केली. पण असे करता येणार नाही, त्याविरोधात पुन्हा कोर्टबाजी होईल. यावर निर्णय घेण्यासाठीच आपण विशेष अधिवेशन बोलवत आहोत. तेव्हा अधिवेशनात या संदर्भात ठोस भूमिका घेता येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. परंतु अधिवेशनाला अजून बराच वेळ असल्याचे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले. परंतु त्यांना हे पटले नाही. त्यानंतर मी राज्यपालांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. राज्यपालांचे एडीसी यांच्याशी बोलणे झाले. त्यांच्याही निदर्शनास हा मुद्दा आणून दिला. तसचे मराठा आरक्षणा संदर्भात अध्यादेश काढण्यास टाळाटाळ करणारे राज्य सरकार बरखास्त करा अशी मागणी आपण त्यांच्याकडे केली असल्याचेही हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री, राज्यपाल कार्यालयात बोलणे झाल्यानंतरही कुठलाच मार्ग निघत नसल्याने शेवटी मी मंत्रालयाशेजारी असलेल्या महात्मा गांधीच्या समाधीजवळ ठिय्या देण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी मला आंदोलन करण्यास मज्जाव केला, पण मी ठाम आहे. तुम्हाला अटक करू असे पोलीस म्हणत आहेत. पोलिसांनी मला खुशाल अटक करावे असे त्यांनी अटक होण्यापूर्वी सप्षट केले. अध्यादेश काढल्या शिवाय मी इथून हटणार नाही असा इशारा देखील हर्षवर्धन जाधव यांनी दिला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख