harshwardhan jadhav and new party | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

शिवसेनेशी आता माझा संबंध नाही, विषमतेविरोधात माझा नवा पक्ष - हर्षवर्धन जाधव

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 18 सप्टेंबर 2018

औरंगाबाद : मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणासाठी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे फक्त मराठा समाजाला आरक्षण दिले तरी तो मी मागे घेणार नाही. आतापर्यंत सगळ्याच राजकीय पक्षांनी जाती-जातीत तेढ निर्माण करत सामाजिक विषमता कशी वाढेल असेच प्रयत्न केले. ही सामाजिक विषमता दूर करण्यासाठी मी नव्या राजकीय पक्षाची स्थापना करतो आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पक्षाचे नाव जाहीर करीन. आता नवा पक्ष काढत असल्यामुळे माझा शिवसेनेशी कुठलाही संबंध राहणार नाही अशी घोषणा कन्नड-सोयगावचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केली. 

औरंगाबाद येथील तापडीया नाट्य मंदिरात नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्यासाठी हर्षवर्धन जाधव यांनी आज (ता.18) मराठा समाजासह 18 पगड जातीच्या लोकांच्या उपस्थितीत चिंतन बैठक घेतली. अध्यक्षीय समारोप करतांना आपण नवा राजकीय पक्ष काढत असल्याची घोषणा त्यांनी केली. पक्षासाठी काही नावे निश्‍चित केली आहेत. निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली असून एका नावावर शिक्कामोर्तब केल्यावर ते जाहीर करीन असे स्पष्ट करतांनाच येत्या महिन्या-दीड महिन्यात पक्षाची अधिकृत नोंदणी करण्यात येणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. 

उध्दव ठाकरे मला जीव लावतात.. 
राजकीय पक्षाची घोषणा केल्यामुळे सहाजिकच मी शिवसेना सोडली का असा प्रश्‍न समोर येतो असे सांगत प्रसार माध्यमांशी बोलतांना हर्षवर्धन जाधव यांनी "माझ्या वतीने आज शिवसेनेशी संबंध संपला' असे जाहीर केले. शिवसेनेशी माझे कुठेलही वाद नाहीत. उध्दव ठाकरे आणि माझे कौटुंबिक संबध आहेत. ते मला जीव लावतात, मी त्यांना जीव लावतो. पण पक्षाची काही धोरण मला पटली नाहीत, विशेषता मराठा आरक्षणावर तुम्ही बोलू नका ही सूचना मला आवडली नाही. शिवाय आमदारकीचा राजीनामा आणि आता नवा पक्ष मी काढतोय म्हटल्यावर माझ्या शिवसेनेशी तसा संबंध राहणारच नाही असेही हर्षवर्धन जाधव यांनी सांगून टाकले. 

संबंधित लेख