स्वतंत्र मराठा राजकीय पक्ष स्थापनेसाठी 18 सप्टेंबरचा मुहूर्त ? हर्षवर्धन जाधव यांनी बोलावली बैठक
औरंगाबाद : मराठा, धनगर, मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन झाले. सरकारने मागसवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर 20 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे. पण सरकारच्या आश्वासनावर आता कुणाचीही विश्वास राहिलेला नाही. स्वतंत्र मराठा राजकीय पक्ष काढण्याची संकल्पना मी मांडली होती. यावर मराठा समाजासह अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन नवा पक्ष स्थापन करावा का? यावर चर्चा व अंतिम निर्णय घेण्यासाठी येत्या 18 सप्टेंबरला आपण महत्वाची बैठक बोलावली असल्याचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले.

गेल्या महिन्यात कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत स्वंतत्र मराठा समाजाचा राजकीय पक्ष काढण्याच्या माझ्या निर्णयावर काही नेते आणि समाज बांधवांनी थांबण्याचा सल्ला दिला होता. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करतय, मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर विधीमंडळ अधिवेशन बोलावून त्यात आरक्षणाचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे या बैठकीत सांगण्यात आले होते.
त्यामुळे राजकीय पक्ष काढण्याचा विचार तेव्हा बाजूला ठेवला होता. पण केवळ मराठाच नाही तर धनगर, मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळाले पाहिजे ही माझी भूमिका आहे. मात्र सरकार या प्रश्नावर पुन्हा चालढकल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकार वारंवार आपली भूमिका बदलत असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला.
औरंगाबाद येथील कॉंग्रेसचे उपोषण सोडतांना मुख्यमंत्री कार्यालयाकडून जे लेखी पत्र आंदोलकांना देण्यात आले, त्यात देखील मराठा आरक्षण कधी देणार याचा निश्चित उल्लेख नव्हता. आरक्षणाच्या विषयावरून मराठा, धनगर, मुस्लिम समाजासह 18 पगड जातींमध्ये एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होऊ नये अशी आपली इच्छा आहे. मग जर राजकीय पक्षाची स्थापना करायचीच असेल तर आणखी उशीर कशाला असा विचार करून या संदर्भात केवळ मराठाच नाही तर अठरा पगड जातीतील लोकांची मते जाणून घेण्यासाठी 18 सप्टेंबर रोजी औरंगाबादेत महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत चर्चा आणि लोकांची मते जाणून घेण्याचा माझा प्रयत्न आहे.
लोकांचा राजकीय पक्ष काढण्याच्या मागणीला सकारात्मक पाठिंबा मिळाला तर याच बैठकीतून स्वंतत्र राजकीय पक्ष स्थापनेची घोषणा होऊ शकते असे देखील हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केले.