harshwardhan jadhav and cm | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

मराठा तरुणांचे जीव गेलेले असतांना मुख्यमंत्री जल्लोष साजरा करा असे कसे सांगू शकतात - हर्षवर्धन जाधव

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय व्हायचाय, पण मुख्यमंत्र्यांनी मात्र मराठा समाजाला "आता आंदोलन नको एक डिसेंबरला जल्लोषाची तयारी करा' असे विधान शनिशिंगणापूरमध्ये नुकतेच केले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन काही उपकार केलेले नाहीत. शिवाय आरक्षणासाठी मराठा समाजातील बेचाळीस तरूणांनी आपले प्राण गमवालेले आहेत. अशावेळी जल्लोष साजरा करा हे मुख्यमंत्र्यांचे आवाहन दुर्दैवी आणि संतापजनक आहे. मराठा पोरांच्या तिरडीवर आम्ही आनंदोत्सव साजरा करायचा का ? असा सवाल आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. 

राज्य मागासवर्गीय समितीने मराठा आरक्षणा संदर्भातला आपला अहवाल नुकताच सरकारला सादर केला. त्यानंतर शनिशिंगनापूर येथे दर्शनासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला जल्लोषाची तयारी करा असे आवाहन केले होते. यावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वप्रथम राजीनामा देणारे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हर्षवर्धन जाधव म्हणाले, मुळात मराठा आरक्षण द्यायला सरकारने तीन-चार वर्ष लावले. हा प्रश्‍न रखडत ठेवल्यामुळे राज्यभरातील समाज रस्त्यावर उतरला. उद्विगनेतून बेचाळीस मराठा तरूणांनी आरक्षणासाठी बलिदान दिले. असे असतांना मुख्यमंत्री जल्लोष साजरा करा असं कस सांगू शकतात. आरक्षण मिळणार याचा आनंद असला तरी त्याच बरोबर या लढ्यात ज्या मराठा तरुणांनी प्राणांची आहुती दिली त्याचे दुःख मोठे आहे. 

या तरुणांचे जीव जाऊ न देता सरकारने आरक्षण दिले असते तर नक्कीच समाजाने जल्लोष केला असता, फटाके फोडले असते. पण आज ती वेळ नाहीये. मराठा तरूणांच्या तिरडीवर आम्ही जल्लोष साजरा करायचा का? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी उत्साहाच्या भरात अशी चुकीची विधाने करू नयेत असे आवाहनही हर्षवर्धन जाधव यांनी केले. 

संबंधित लेख