harshwardhan jadhav and aurangabad | Sarkarnama

महिला बचत गटाच्या पाठिंब्यासाठी धावले आमदार हर्षवर्धन जाधव

माधव इतबारे
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : महापालिकेच्या कचरा प्रश्‍नावर आक्रमक होत माझ्या कन्नड मतदारसंघात कचरा आणा, मी शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न सोडवतो असे खुले आव्हान महापालिकेला देणारे आमदार हर्षवर्धन जाधव आज साफसफाईचे काम करणाऱ्या महिला बचत गटांच्या मदतीला धावून आले. महापालिकेने साफसफाईसाठी खासगी कंपनी नियुक्त केल्यामुळे सिडको-हडकोत 2009 पासून साफसफाईचे काम करणाऱ्या 15 महिला बचतगटांवर गंडांतर आले आहे. त्यामुळे बचतगटाचे काम कायम ठेवावे या मागणीसाठी महिलांनी बुधवारपासून (ता. 24) महापालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. 

गुरुवारी (ता. 25) आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आंदोलनाला पाठिंबा देत उपोषणात हजेरी लावली. दोन ऑक्‍टोबरला महापालिका आयुक्तांसोबत यासंदर्भात बैठक घेण्यात येईल, असे लेखी पत्र दिल्याने सायंकाळी हे उपोषण मागे घेण्यात आले. महापालिकेने पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला कचरा संकलन व वाहतुकीचे कंत्राट दिले आहे. त्यामुळे सिडको व सातारा परिसरातील सफाईचे अतिरिक्त काम म्हणून बचतगटांकडेच राहू द्यावे यासह इतर मागण्यांसाठी महिला बचतगट प्रमुखांनी उपोषण सुरू केले होते. गुरुवारी दुपारी आंदोलनाला पाठिंबा देत आमदार जाधव उपोषणात सहभागी झाले. घन कचरा विभागाचे प्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी त्यांची भेट घेऊन आयुक्त सुटीवरून आल्यानंतर महिला बचतगटासोबत बैठक घेणार असल्याचे सांगितले. 

मात्र जाधव यांनी लेखी पत्र देण्याची मागणी केली. पत्र देण्यास अधिकाऱ्यांनी दोन तास लावले. दोन तासांनंतर लेखी पत्र घेऊन अधिकारी आले; मात्र त्यात तारीख व वेळ निश्‍चित नसल्याने जाधव यांनी संताप व्यक्त केला. "माझे जिल्हाधिकाऱ्यासोबत बोलणे झाले असून, जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तांना बैठक घेऊन मार्ग काढण्यास सांगितले असल्याने बैठकीची तारीख व वेळ टाकून नव्याने पत्र देण्याची सूचना भोंबे यांना केली. दुरुस्तिपत्र देण्यासाठी पुन्हा जाधव यांना दोन तास वाट बघावी लागली. अखेर बैठक दोन नोव्हेंबरला घेण्याचे लेखी पत्र देण्यात आले. 

संबंधित लेख