खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील मंत्रालयामध्ये

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नासाठी महसूलचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचीआज बुधवारी (ता. २३) रोजी मंत्रालयामध्ये भेट घेवून खंडकरी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याची मागणी केली. श्रीवास्तव यांनी खंडकऱ्यांच्या प्रश्‍नामध्ये लक्ष घालून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करुन स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे आश्वासन दिल्याी माहिती पाटील यांनी दिली.
खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील मंत्रालयामध्ये

वालचंदनगर : माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्‍नासाठी महसूलचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची  आज बुधवारी (ता. २३) रोजी मंत्रालयामध्ये भेट घेवून खंडकरी शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याची मागणी केली. श्रीवास्तव यांनी खंडकऱ्यांच्या प्रश्‍नामध्ये लक्ष घालून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी तातडीने चर्चा करुन स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करणार असल्याचे आश्वासन दिल्याी माहिती पाटील यांनी दिली.

'राज्यामध्ये सात जिल्हामध्ये खंडकऱ्यांचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. यामध्ये पूर्वी खंडकरी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जमीनीचा वर्ग-२ चा शेरा काढावा. खंडकरी शेतकऱ्यांना पाटपाण्याच्या हक्कासहित जमीने वाटप झाले असून शेतकऱ्यांना प्राधान्याने पाणी देण्यात यावे. ज्या खंडकरी शेतकऱ्यांना जमीनी मिळाल्या नाहीत त्यांना तातडीने वाटप प्रक्रिया सुरु करावी. सध्या शेती महामंडळाची शिल्लक राहिलेली जमीन संयुक्त शेती करार पद्धतीने देण्यात आली असून सर्व जमीन घेतलेले बडे उद्योजक आहेत. बडे उद्योजकामुळे खंडकरी शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळण्यास अडचण होत असल्याने संयुक्त करार पद्धतीने घेतलेल्या जमीनीसाठी स्वतंत्रय अधिकाऱ्यांची नेमणूक करावा.खंडकरी शेतकऱ्यांचे वाटप प्रक्रिया पूर्ण होईल संयुक्त शेती करार पद्धतीने घेतलेल्या करारधारकांना वापरासंबधी प्रतिबंध घालावा.एक एकराच्या आतील क्षेत्र असणाऱ्या खंडकरी शेतकऱ्यांना तातडीने जमीन वाटप करावे. तसेच खंडकरी शेतकऱ्यांचे वाटप पूर्ण झाल्याशिवाय शिल्लक जमीन संयुक्त करार पद्धतीने देण्यात येवू नये,' अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी  खंडकरी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी बी. डी. पाटील, माजी सभापती प्रदीप पाटील, बाळासाहेब डोंबाळे,अॅड.पांडुरंग गायकवाड,कर्मयोगी चे संचालक राजेंद्र गायकवाड  उपस्थित होते.

खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी पाठपुरावा करणार
काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन खंडकरी शेतकऱ्यांना जमिनी देण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. खंडकऱ्यांची काही प्रश्‍न प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्‍नासाठी आज मंत्रालयामध्ये बैठक घेण्यात आली. खंडकरी शेतकऱ्यांवर अन्याय होत असून त्यांना हक्काचे पाणी, वीज व  पूर्वी वाटप करण्यात आलेल्या जमीनीवरील वर्ग -२ शेरा काढण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. तालुक्यातील खंडकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून प्रश्‍न सुटेपर्यत सर्व महसुलच्या मुख्य सचिवांच्या  संपर्कात राहणार आहे," असे पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com