harshvardhan jadhav mla shivsena | Sarkarnama

मराठा आरक्षणावर बोलायचे नाही असा एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावरून मला फोन- हर्षवर्धन जाधव

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 जुलै 2018

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात तरुण जीव देतायेत, आणि अशावेळी आमच्या पक्षाचे मराठा असलेले मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावरून मला "मराठा आरक्षणावर बोलायच नाही' असा फोन आल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. माझ्यासाठी हे धक्कादायक असून पक्ष आणि मंत्र्यांचे हेच धोरण असेल तर मी याचा निषेध करतो. आज स्व. आनंद दिघे असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना ठिकाणावर आणले असते असा टोला देखील जाधव यांनी लगावला. 

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर मुंबईत मंत्रालयाबाहेर ठिय्या आंदोलन देणारे कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज (ता. 31) आपल्याच पक्षाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर "मराठा आरक्षणावर बोलायचे नाही' असा निरोप दिल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. यासंदर्भात सरकारनामाशी बोलतांना हर्षवर्धन जाधव म्हणाले. पक्षप्रमुखांनी बोलावलेल्या मराठा आरक्षण विषयावरील बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मी काल मुंबईत आलो होतो. बैठकीपुर्वी स्वतंत्रपणे भेटण्याची परवानगी मी त्यांच्याकडे मागितली होती. पण मला मिळाली नाही. 

दरम्यान, औरंगाबादमध्ये आणखी एका मराठा तरूणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याचे मला समजले आणि मी आधी मुख्यमंत्री व नंतर राज्यपाल महोदयांच्या कार्यालयात फोन करून अध्यादेश काढण्याची मागणी केली होती. त्यावर काहीच निर्णय होत नाही म्हटल्यावर मी मंत्रालयाजवळ असलेल्या महात्मा गांधीच्या पुतळ्याजवळ ठिय्या दिला, तर मला अटक केली. आज सकाळी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मी गाडीतून एअरपोर्टला निघालो तेव्हा आमच्या पक्षाचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाहून मला फोन आला. "मराठा आरक्षणावर तुम्ही यापुढे बोलायचे नाही असा तुम्हाला साहेबांचा निरोप आहे' असे समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने मला सांगितले. त्यावर मी फक्त ठीक आहे असे म्हणत फोन ठेवून दिला. फोनवर बोलणारी व्यक्ती बहुदा त्यांचे पीए असावेत आणि शिंदे साहेबांच्या सांगण्यावरूनच त्यांनी मला फोन केला असावा. 

पक्षाचे हेच धोरण असेल तर निषेध.. 
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रोज माणस मरतायेत, त्यांच्या न्यायहक्कासाठी माणुसकीच्या भावनेतून मी या आंदोलनात उडी घेतली आहे, या मागे कुठलेही राजकारण नाही. अशावेळी मला गप्प बसायला सांगितले जाते. एकनाथ शिंदे हे स्वतः मराठा आहेत आणि म्हणून पक्षाची देखील हीच भूमिका असेल तर मी त्याचा निषेध करतो. या फोन किंवा निरोपा संदर्भात आपले एकनाथ शिंदे यांच्यांशी बोलणे झाले का ? यावर नाही, पण त्यांच्याच घरून फोन होता. त्यांनी सांगितल्याशिवाय मला निरोप मिळणार नाही असा दावा करत हर्षवर्धन जाधव यांनी नाराजी व्यक्त केली. 
 
संबंधित लेख