harshawardhan jadhav attack ambadas danave for maratha | Sarkarnama

मराठ्यांचे जीव जात असतांना पक्ष शिस्त शिकवू नका, हर्षवर्धन जाधवांनी दानवेंना फटकारले 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

औरंगाबाद ः मराठ्यांच्या जीवापेक्षा पक्षशिस्त मोठी असू शकत नाही. पक्षशिस्त पक्षासाठी आहे आणि पक्ष जनतेसाठी. मराठा आरक्षणासाठी तरुणांचे जीव जात असतांना पक्षशिस्त धरून बसणे योग्य नाही. त्यामुळे अंबादास दानवेंनी पक्षाचे लांगूनचालन न करता मराठा समाजाच्या पाठीशी ठाम राहावे, मला पक्षशिस्त शिकवू नये अशा शब्दांत आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पलटवार केला. 

मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीसाठीच मी मुंबईत गेलो होतो. पण औरंगाबादेत पुन्हा एका मराठा तरूणाने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचे मला कळाले. तेव्हा बैठकीच्या वेळेपर्यंत थांबण्या ऐवजी सकाळी दहा वाजताच उध्दव ठाकरेंची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा प्रकार मला घालायचा होता. जेणेकरून ते मुख्यमंत्र्यांना तात्काळ फोन करतील आणि मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढायला लावतील हाच माझा हेतू होता असेही हर्षवर्धन जाधव यांनी स्पष्ट केले. 

दानवेंना कॉल रेकॉर्ड दाखवतो 

मंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला मराठा आरक्षणावर बोलू नका हे सांगण्यासाठी फोन केला होता असा दावा हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा केला. त्यांचा कॉल माझ्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड झाला आहे. अंबादास दानवेंनी मी ते कधीही दाखवायला तयार आहे. 

ते स्वतः एक मराठा आहेत, त्यामुळे त्यांनी पक्षाचे लांगूनचालन न करता मराठ्यांसोबत राहावे. मराठ्यांचे जीव जात आहेत, दर दोन तासाला एक मराठ्याची आत्महत्या होत आहे. अशा परिस्थीतीत त्यांनी मला पक्षशिस्त समजावून सांगू नये असा टोला देखील हर्षवर्धन जाधव यांनी दानवेंना लगावला. 

मराठा समाजात भांडण लावायची, हर्षवर्धन जाधव- अंबादास दानवेंमध्ये भांडण लावायच आणि मजा पहायची अशी साधारण रुपरेषा दिसते असा आरोपही जाधव यांनी शिवसेनेचे नाव न घेता केला. 

संबंधित लेख