harshawardha jadhav say i will fight assembly election | Sarkarnama

लोकसभा नव्हे विधानसभाच लढवणार : हर्षवर्धन जाधव 

संजय जाधव
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

कन्नड ः मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान मराठवाडा व राज्यभर माझी भूमिका पोहोचल्याने, मी लोकसभा निवडणूक लढावी, अशी मागणी होत आहे. मात्र मला लोकसभा निवडणूक लढवण्यात कोणतेही स्वारस्य नाही, मी कन्नड विधानसभा निवडणूकच लढवणार असल्याचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी (ता.14) कन्नड तेथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

मराठा ठिय्या आंदोलनात आमदार जाधव यांचे निकटचे प्रतिस्पर्धी माजी कॉंग्रेस आमदार नितीन पाटील यांनी आमदार जाधव यांचे जाहीर कौतुक केल्याने मतदारसंघात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.जाधव हे लोकसभा तर माजी आमदार नितीन पाटील विधानसभा निवडणूक एकाच पक्षाकडून लढणार असल्याचे बोलले जात होते. दोघांना एकमेकांच्या शक्तीस्थळांचा फायदा होऊन यश मिळू शकते,अशीही चर्चा होती. 

या पार्श्‍वभूमीवर आज आमदार कन्नड येथे आले असता त्यांनी या चर्चेला पुर्णविराम दिला. आपण विधानसभा निवडणूकच लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. "कुश्‍ती अभी बाकी है' असे सांगत त्यांनी सस्पेंसही कायम ठेवला आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख