harshawardha jadhav resign | Sarkarnama

चारची डेडलाईन संपताच आमदार हर्षवर्धन जाधवांनी दिला राजीनामा 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 जुलै 2018

औरंगाबाद ः मराठा आरक्षणाचा अद्यादेश न काढल्यास आपण राजीनामा देऊ असा इशारा शिवसेनेचे कन्नड येथील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मंगळवारी (ता.24) दिला होता. चार वाजेची डेडलाईन संपल्यानंतर आज हर्षवर्धन जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनस्थळावरूनच आपल्या आमदारकीचा राजीनामा लिहलेले पत्र विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना मेलद्वारे पाठवून दिले आहे. 

मराठा समाजाला अद्यादेश काढून त्वरित आरक्षण जाहीर करा यासह इतर मागण्यांसाठी आमदार जाधव यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांना दिले होते. 

त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना बुधवारी दुपारी चार वाजेपर्यंत सरकारने जर मराठा आरक्षणा संदर्भात अद्यादेश काढला नाही तर आपण आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे देणार असल्याची घोषणा केली होती. त्यानूसार जाधव यांनी आज आंदोलनस्थळी पत्रकार परिषद घेऊन " 25 जुलैपासून आपण विधीमंडळ सदस्यपदाचा राजीनामा देत आहे' असा मजकूर लिहलेले राजीनामा पत्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना मेल केले. 

उद्या (ता. 26) मुंबईला जाऊन सकाळी अकरा वाजता विधिमंडळात जाऊन मी राजीनामा सादर करणार असल्याचेही हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी स्पष्ट केले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख