मुंडेंच्या विचाराचे आम्हीच  वारसदार, पंकजा तर केवळ संपत्तीच्या  : आमदार राठोड

आंदोलनाच्या निमित्ताने बीडमध्ये आलेल्या आमदार हरीभाऊ राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधत पंकजा मुंडे यांच्यावर टिका केली. आंदोलनातही त्यांनी अशीच टिका केली.आता राठोड यांच्या टिकेला मुंडे समर्थक कसे उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे आहे.
Munde-Rathod.
Munde-Rathod.

बीड : " मंत्री पंकजा मुंडे जरी स्वत:ला ओबीसींच्या नेत्या मानत असल्या तरी आम्ही ते मान्य करत नाही. त्यांनी ओबीसींच्या समस्या पंधरा दिवसांत सोडविल्या तर त्यांना ओबीसी नेत्या म्हणवून घेता येईल."

दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या त्या फक्त प्रॉपर्टीच्या वारदासदार असून विचारांचे वारसदार आम्हीच आहोत ," असा दावा  आमदार काँग्रेसचे हरीभाऊ राठोड यांनी केला आहे .

बंजारा समाज आणि बारा अलुतेदार व बलुतेदारांच्या आंदोलनासाठी सोमवारी शहरात आलेल्या आमदार हरिभाऊ राठोड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तत्पुर्वी ओबीसी आंदोलनातही त्यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर टिका केली.

श्री. राठोड म्हणाले, " दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांनी ओबीसी समाजाच्या जनगणनेची मागणी केली होती. मात्र, भाजप सरकारच्या काळात या मागणीला बगल दिली आहे. देशातील सर्व ओबीसी वंचित समाजाला एकत्र आणण्याचे काम करण्यात येत आहे. "
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com