खैरे अजूनही नगरसेवकाच्या भूमिकेत  : हरिभाऊ बागडे यांनी आदित्य ठाकरेंसमोरच काढला खासदारांना चिमटा 

अर्धवट माहितीच्या आधारे आमचा नगरसेवकही बोलत नाही, मात्र चंद्रकांत खैरे खासदार असताना काहीही आरोप करतात. खैरे जरा खासदारासारखे वागा असा चिमटा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (ता.23) शहर बसच्या उद्घाटनप्रसंगी काढला. विशेष म्हणजे यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
Haribhau Bagde- Chandrakant Khaire
Haribhau Bagde- Chandrakant Khaire

औरंगाबाद : अर्धवट माहितीच्या आधारे आमचा नगरसेवकही बोलत नाही, मात्र चंद्रकांत खैरे खासदार असताना काहीही आरोप करतात. खैरे जरा खासदारासारखे वागा असा चिमटा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (ता.23) शहर बसच्या उद्घाटनप्रसंगी काढला. विशेष म्हणजे यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. 

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रविवारी ठाकरे यांच्या हस्ते शहर बस सेवेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शिवसेना-भाजप युतीच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला. दोन दिवसापूर्वी खासदार खैरे यांनी हरिभाऊ बागडे यांच्यावर कषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्याचा वचपा बागडे यांनी ठाकरे यांच्या समोर काढला. 

ते म्हणाले, ''खासदार अजूनही नगरसेवकाच्याच भुमिकेत आहेत, त्यांनी त्यातुन बाहेर यावे. अर्धवट माहिती आधारे आमचा नवीन नगरसेवकही बोलत नाही. महापालिकेला राज्य आणि केंद्र सरकारने मिळून अडीचशे ते पावणे तीनशे कोटी रुपये दिले. परंतू, ते अद्यापही खर्च करण्यात आले  नाहीत. शहराचा विकास आराखडा तयार नाही." आदित्यजी या  शहराकडे तुम्ही लक्ष द्या, असे सांगत बागडे यांनी शिवसेना नेत्यांना फैलावर घेतले. 

कै. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची निविदा महापालिकेला का काढता आली नाही असा सवालही त्यांनी केला. शहर बस, भूमिगत गटार  योजनेचा मी यजमान आहे. योजनेत कुणाचे श्रेय नाही. ते फक्त माझेच आहे, महापालिकेचेही नाही, असा दावा खासदार खैरे यांनी केला. खैरे यांच्या प्रयत्नांमुळे या योजना आल्या नाहीत तर यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचाही तेवढाच मोठा वाटा आहे, असे भाजपचे आमदार अतुल सावे यांनी सांगितले.

खासदार खैरे माध्यम प्रतिनिधींवर उखडले
आदित्यठाकरे व्यासपीठावर आले असता, आता  बाईटसाठी आमच्या पाठीमागे धावत आहात. आता मी देणार नाही, असे खैरे म्हणाले. माजी खासदार प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, ऋषिकेश जैस्वाल, किरण तुपे यांनी मध्यस्थी केल्यानंतर प्रकरण निवळले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com