haribhau bagade fulambri cogress social media team active | Sarkarnama

हरिभाऊ बागडेंच्या मतदारसंघात कॉंग्रेसची सोशल मिडिया टीम जोरात 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

औरंगाबाद : विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री मतदारसंघात कॉंग्रेसच्या सोशल मिडिया टीमने जोरदार बांधणी करत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. 

मुंबईतील टिळक भवनात झालेल्या विशेष बैठकीत या कामाबद्दल कॉंग्रेसचे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह फुलंब्री विधानसभा मतदारसंघातील सोशल मिडिया अध्यक्ष राहूल मते यांचा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

2014 मध्ये बागडे यांच्याकडून कॉंग्रेसच्या डॉ. कल्याण काळे यांचा पराभव झाला होता. आगामी निवडणुकीत बागडे-काळे यांच्यात पुन्हा लढत होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या निवडणुकीतील पराभावचे उट्टे काढण्यासाठी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. 

गेल्या वर्षभरापासून फुलंब्री मतदारसंघात डॉ. काळे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बुथ कमिटी पासून आगामी काळातील सोशल मिडियाचे महत्व ओळखून काळे यांनी मतदारसंघातील बुथनिहाय सोशल मिडिया अध्यक्षांची निवड करत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. 

या सर्व सोशल मिडिया अध्यक्षांची यादी नुकतीच कॉंग्रस सोशल मिडियाच्या राज्य अध्यक्षांकडे सोपवण्यात आली. विशेष म्हणजे फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा अशी यादी सादर करणारा राज्यातील पहिला मतदारसंघ ठरला आहे.  

संबंधित लेख