haribhau bagade birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : हरिभाऊ बागडे, विधानसभा अध्यक्ष 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

हरिभाऊ बागडे यांचा जन्म 17 ऑगस्ट 1945 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील चितेपिंपळ गाव येथे शेतकरी कुटुंबात झाला. 1958 पासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. 1965 ते 69 दरम्यान त्यांनी विवेक साप्ताहिकाचे प्रतिनिधी म्हणून पत्रकारिता देखील केली. 67 ते 79 या काळात बागडे यांनी जनसंघाचे पूर्णवेळ काम केले. जिल्ह्यातील फुलंब्री, औरंगाबाद पूर्व विधानसभा व जालना लोकसभा मतदारसंघात त्यांनी प्रचारक म्हणून जबाबदारी पार पाडली. 1980 मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्यानंतर 1985 मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले.

हरिभाऊ बागडे यांचा जन्म 17 ऑगस्ट 1945 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील चितेपिंपळ गाव येथे शेतकरी कुटुंबात झाला. 1958 पासून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. 1965 ते 69 दरम्यान त्यांनी विवेक साप्ताहिकाचे प्रतिनिधी म्हणून पत्रकारिता देखील केली. 67 ते 79 या काळात बागडे यांनी जनसंघाचे पूर्णवेळ काम केले. जिल्ह्यातील फुलंब्री, औरंगाबाद पूर्व विधानसभा व जालना लोकसभा मतदारसंघात त्यांनी प्रचारक म्हणून जबाबदारी पार पाडली. 1980 मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्यानंतर 1985 मध्ये औरंगाबाद पूर्व विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडून आले. 90-95 च्या विधानसभा निवडणुकीतही हरिभाऊ बागडे विजयी झाले. 

1995 ते 97 राज्यातील युती सरकारच्या काळात ते रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री झाले. तर पुढील दोन वर्षे त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून काम पाहिले. या शिवाय त्यांच्याकडे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील होते. भाजपचे जिल्हा सरचिटणीस, प्रदेश चिटणीस, किसान मोर्चाचे अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष पद देखील भूषविले. सध्या हरिभाऊ बागडे भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष, छत्रपती संभाजी राजे साखर उद्योगाचे संस्थापक व महाराष्ट्र विधानसभा सभेचे अध्यक्ष आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख