haribhau bagade and jadhav | Sarkarnama

हर्षवर्धन जाधवांचा राजीनामा मिळाला, चिकटगांवकरांचा नाही - हरिभाऊ बागडे

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

औरंगाबाद : कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा आज (ता. 26) माझ्याकडे कार्यालयात सुर्पूद केला आहे. वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर यांचे राजीनामा मात्र अद्याप माझ्याकडे आलेला नाही असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले. मराठा आरक्षणाचा अद्यादेश काढा नाहीतर आमदारकीचा राजीनामा देतो असा इशारा हर्षवर्धन जाधव यांनी दिला होता. डेडलाईन संपताच त्यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे पत्र बुधवारी (ता.25) विधानसभा अध्यक्षांकडे मेलद्वारे पाठवले होते. 

तसेच उद्या (ता.26) सकाळी आपण विधानभवनात जाऊन अध्यक्षांकडे प्रत्यक्ष भेटून राजीनामा देणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले होते. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याशी सरकारनामा प्रतिनिधीने संपर्क साधला असता हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा आपल्याला मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर राष्ट्रवादीचे वैजापूर येथील आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांचा राजीनामा आपल्याकडे आलेला नाही. किंवा कार्यालयीन मेलवर त्यांनी तो पाठवला आहे का? याची माहिती घ्यावी लागेल असे बागडे म्हणाले. 

राजीनाम्यावर अधिवेशनात निर्णय.. 
हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा आपण स्वीकारला का? असे विचारले असता हरिभाऊ बागडे म्हणाले, येणाऱ्या अधिवेशनात विधीमंडळाच्या कलम 299 नूसार जाधव यांच्या राजीनाम्याचे वाचन सभागृहात केले जाईल. त्यानंतर निवडणूक आयोगाकडे तो पाठवून जागा रिक्त झाल्याची माहिती द्यावी लागते. ही प्रक्रिया झाल्यानंतरच राजीनामा मंजुर झाला असे अधिकृतपणे सांगता येईल. दरम्यानच्या काळात संबंधित सदस्य आपला राजीनामा मागेही घेऊ शकतात. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख