Haribhau Badgde Taunts Chandrakant Khaire | Sarkarnama

धरण भरेल पण शहाराला पाणी खैरेंच्या आशीर्वादानेच : हरिभाऊ बागडे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 23 सप्टेंबर 2018

''यंदा पहिल्यांदा असे झाले की बाप्पांचे आगमन झाले आणि पाऊस पडला नाही. प्रार्थना करतो की पाऊस पडेल, जायकवाडी पण भरेल. पण खैरे साहेबांनी आशीर्वाद दिला तर पाईपलाईन होतील आणि शहराला पाणी मिळेल," असा चिमटा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांना उद्देशून काढला.

औरंगाबाद : ''यंदा पहिल्यांदा असे झाले की बाप्पांचे आगमन झाले आणि पाऊस पडला नाही. प्रार्थना करतो की पाऊस पडेल, जायकवाडी पण भरेल. पण खैरे साहेबांनी आशीर्वाद दिला तर पाईपलाईन होतील आणि शहराला पाणी मिळेल," असा चिमटा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांना उद्देशून काढला.

जिल्हा गणेश महासंघातर्फे संस्थान गणपती येथील मिरवणूक आरंभ प्रसंगी ते बोलत होते. शहराच्या पाणीप्रश्नाला गणेश विसर्जनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा वाचा फुटली. मिरवणुकीपूर्वी आयोजित कार्यक्रमात शिवसेना नेते खासदास चंद्रकांत खैरे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार संजय शिरसाट, माजी आमदार कल्याण काळे, प्रदीप जैस्वाल आदींची उपस्थिती होती.

यावेळी भाषणासाठी उभे राहिलेले हरिभाऊ बागडे यांनी शहरातील गणेश मंडळांची परंपरा सांगत गणेशोत्सवात पडणारा पाऊस सांगितला. यंदा पावसाने दडी दिल्याचे सांगत त्यांनी पाऊस पडो, जायकवाडी धरणही भरो, अशी प्रार्थना आपण करत असल्याचे सांगितले. हे सांगतानाच त्यांनी आपला मोर्चा शहराच्या पाणीप्रश्नाकडे वळवला. पाऊसाची आशा सांगून त्यांनी जायकवाडी धरण भरण्याची अपेक्षाही व्यक्त केली. खैरे साहेब आपण आशीर्वाद दिला तर पाईपलाईन (समांतर) पण होईल आणि शहरला पाणीही मिळेल, असा चिमटा हरिभाऊ बागडे यांनी यावेळी काढला. त्यांचा या वाक्याने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

संबंधित लेख