हार्दिकने पाठ फिरवल्याने शेट्टींवर रस्त्यावर खुर्ची टाकून बसण्याची वेळ! 

हार्दिकने पाठ फिरवल्याने शेट्टींवर रस्त्यावर खुर्ची टाकून बसण्याची वेळ! 

पुणे: दूध आंदोलनात सक्रिय सहभागी होवून गुजरातहून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा शब्द पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी दिल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी जाहीर केले होते. राज्यात आंदोलनाला प्रतिसाद मिळत असनाता हार्दिकने मात्र आंदोलनाकडे सपशेल पाठ फिरवल्याचे चित्र आहे. परिणामी शेट्टींना पालघरला जावून गुजरातहून येणारे टॅंकर स्वत: आडवावे लागत आहेत. 

ेंशेट्टींनी रविवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाची घोषणा केली होती, मात्र सायंकाळीच काही कार्यकर्त्यांनी तोडफोडीस सुरवात केली. आंदोलनाचा मूड लक्षात आल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली. त्यांनी कारवाई सुरु केली आहे. दुसऱ्या बाजूला कार्यकर्ते लपून छपून आंदोलन करत आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रात आंदोलनाला चांगला प्रतिसाद असलातरी गुजरातहून येणारे दूध रोखण्यास संघटनेला यश आले नव्हते. हे दूध रोखले गेले नाहीतर मुंबईची दूधकोंडी होवू शकणार नाही, याची पुर्ण जाणीव असल्याने शेट्टी स्वत: गुजरात हद्दीवर पोचले आहेत. 

पालघर जिल्ह्यात सकाळी पोलिस बंदोबस्तात आलेले दूध टॅंकर त्यांनी परत पाठवले. नंतर ते स्वत: खुर्ची टाकून महामार्गावर बसले.

शेट्टी यांनी आंदोलनापुर्वी हार्दिक पटेलचा पाठिंबा असल्याचे, तसेच स्वत: हार्दिक गुजरातमधील दूधपुरवठा रोखणार असल्याचे जाहीर केले. प्रत्यक्षात हार्दिक पटेलकडून काहीही हालचाल झालेली दिसत नाही. त्यामुळे गुजरातमधून दूध पुरवठा सुरु आहे. तो आजतरी शेट्टींनी आडवून धरल्याचे चित्र आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com