hardik patel supports dhangar st quota | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

धनगरांना आदिवासी कोट्यातील आरक्षण मिळालेच पाहिजे: हार्दिक पटेल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

धनगर आरक्षणावरुन राज्यातील फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

पुणे :  फडणवीस सरकारने धनगरांना आदिवासीं कोट्यात आरक्षण देण्याचे आश्वासन पाळले नाही. मोदी, फडणवीसांनी धनगर समाजाला केवळ आश्वासने देऊन फसवणूक केली आहे. त्यामुळे आता जर ते ऐकत नसतील तर त्यांना घरी बसवण्याची वेळ आली आहे, असे आवाहन गुजरातमधील पटेल आरक्षणाचे नेते हार्दिक पटेल यांनी सांगलीत धनगर समाजाला उद्देशून केले.

 धनगर आरक्षणासाठी आरेवाडीत मंगळवारी गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने झालेल्या मेळाव्यात हार्दिक पटेल यांना निमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, पटेल यांनी व्यासपीठावरुन गुजरातमधील आपल्या पटेल आरक्षणासाठीच्या लढ्याची माहिती उपस्थितांना दिली तसेच धनगर आरक्षणावरुन राज्यातील फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

या मेळाव्यापूर्वी फडणवीस हे खूप ताकदवान असल्याचे आपल्याला सांगण्यात आले होते. मात्र, त्यांना घाबरण्याचे कारण नाही. कारण महाराष्ट्रात मोदी-शाहांसारखे गुंड नाहीत, अशी कडवी टीका त्यांनी मोदी-शाहंवर केली. तसेच रा. स्व. संघावरही टीका करताना संघ सर्वांची दिशाभूल करतोय असे ते म्हणाले.
 

संबंधित लेख