hardik patel sentence two years jail | Sarkarnama

 हार्दिक पटेलसह तिघांना दोन वर्षांचा तुरुंगवास 

वृत्तसंस्था
बुधवार, 25 जुलै 2018

अहमदाबाद : गुजरातमधील एका न्यायालयाने पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल आणि अन्य दोघांना 2015च्या विसनगर दंगल प्रकरणात दोषी ठरविताना त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 

सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. पी. अग्रवाल यांनी हार्दिकसह त्याचे दोन साथीदार लालजी पटेल आणि ए. के. पटेल यांना दंगल घडवून आणणे, जाळपोळ करणे, मालमत्तेचे नुकसान करणे आणि बेकायदा पद्धतीने जमा होणे, यासंबंधित भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत दोषी ठरविण्यात आले. 

न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाबरोबरच तिघांना प्रत्येक 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या प्रकरणातील अन्य 14 आरोपींना सबळ पुराव्यांअभावी निर्दोष ठरविण्यात आले. 

काय आहे प्रकरण? 
पटेल समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चाने हिंसक वळण घेतल्यानंतर जमावाने मालमत्तेचे नुकसान करतानाच प्रसारमाध्यमांच्या काही लोकांवर हल्लाही केला.

या प्रकरणात मेहसाना जिल्ह्याच्या विसनगरमध्ये 23 जुलै 2015ला दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये हार्दिकचेही नाव आरोपींमध्ये नोंदविण्यात आले होते. या हिंसक आंदोलनादरम्यान जमावाने एक गाडीही पेटवून दिली होती आणि स्थानिक भाजप आमदार ऋषिकेश पटेल यांच्या कार्यालयात तोडफोड केली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख