hardik patel press in karad | Sarkarnama

त्यापेक्षा इंग्रजांचे शासन परवडले : हार्दिक पटेल 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

आरक्षण म्हणजे प्रत्येक समाजाला त्याच्या लोकसंख्येनुसार भागिदारी मिळणे होय.

सातारा : आपल्या देशातील विविध समाजाला आपल्या मागण्यांसाठी आंदोलनच करण्याची वेळ येऊ नये, असे काम शासनाने करायला हवे आहे. पण स्वातंत्र्याच्या 60-70 वर्षानंतरही लोकांना रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागते. त्यापेक्षा इंग्रजांचे शासन परवडले असते, असे मत गुजरातच्या पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी व्यक्त केली. 

सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे एका कार्यक्रमाला जाण्यासाठी हार्दिक पटेल जाताना काल रात्री ते कऱ्हाडात आले होते. 

 

महाराष्ट्रात धनगर, मराठा तर गुजरातमध्ये पटेल, जाट, यादव हे सर्व आरक्षणासाठी लढत आहेत, त्यांचे राष्ट्रीय संघटन करण्याचा तुमचा विचार आहे का, या प्रश्‍नावर हार्दिक पटेल म्हणाले, आरक्षण ही काही भिक नाही, तर आपल्या समाजाला प्रतिनिधीत्व देण्यासाठी सर्वजण लढत आहेत. आरक्षण म्हणजे प्रत्येक समाजाला त्याच्या लोकसंख्येनुसार भागिदारी मिळणे होय. त्यासाठी संघटन करण्याची गरज नाही. मुळात विविध समाजाला आंदोलनच करण्याची वेळ येऊ नये, असे काम शासनाने करायला हवे आहे. स्वातंत्र्याच्या 60-70 वर्षानंतर लोकांना रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागते. त्यापेक्षा इंग्रजांचे शासनमध्ये राहिलेले परवडले असते. याबाबत आपण सर्वांनी विचार करण्याची वेळ आली असून शासनानेही यावर निर्णय घेणे गरजेचे आहे. 

गुजरातमधून उत्तर भारतीय लोकांना हाकलून देण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत आपले मत काय आहे, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ही दुखदायक घटना आहे. हा प्रकार मिडियावर अधिक दाखविला गेला. हिंदी भाषिक लोकांशी वादाचा प्रश्‍न गुजरातमध्ये कधीच आला नाही. पण 14 वर्षाच्या मुलीवर बलात्काराची घटना घडली. त्यातून हा प्रकार झाला आहे. एका व्यक्तीकडून अपराध झाला म्हणून संपूर्ण प्रदेशाला अपराधी मानता येणार नाही. जे झाले ते पूर्णपणे चुकीचे आहे. एक व्हिडीओ दाखवा यामध्ये गुजरातमध्ये उत्तर भारतीय लोकांना मारून हाकलत आहेत. पुरावे असल्याशिवाय अशी मारहाण होतेय असे म्हणता येणार नाही.  

संबंधित लेख