hardik patel fast withdrawl | Sarkarnama

हार्दीक पटेलचे उपोषण मागे 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

अहमदाबाद : पटेल आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेले पाटीदार नेते हार्दीक पटेल यांनी आज 19 दिवसांनंतर त्यांचे उपोषण मागे घेतले. 

विशेष म्हणजे या उपोषणादरम्यान गुजरात सरकारने त्याच्याशी कसलीही चर्चा केली नव्हती. पटेल नेते नरेश पटेल आणि सी.के.पटेल यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन त्याने आपल्या उपोषणाची सांगता केली.

यानंतर माध्यमांशी बोलताना हार्दीक म्हणाला की, पटेल आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माझा संघर्ष सुरूच राहील. तत्पूर्वी हार्दीकने 25 ऑगस्टपासूनच त्याच्या निवासस्थानी उपोषण सुरू केले होते. अखेर राज्य सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच त्याला आपले उपोषणास्त्र म्यान करावे लागले. 

संबंधित लेख