hardik patel fast | Sarkarnama

हार्दीक पटेलांची प्रकृती खालावली 

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

अहमदाबाद : गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या प्रमुख मागणीसाठी पाटीदार संघटनेचे नेते हार्दीक पटेल हे गेल्या दहा दिवसापासून बेमुदत उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावली आहे. 

अहमदाबाद : गुजरातमधील पटेल समाजाला आरक्षण मिळावे तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी या प्रमुख मागणीसाठी पाटीदार संघटनेचे नेते हार्दीक पटेल हे गेल्या दहा दिवसापासून बेमुदत उपोषणाला बसले असून त्यांची प्रकृती खालावली आहे. 

>राज्यातील सत्ताधारी भाजपने मात्र या उपोषणाची म्हणावी तशी दखल घेतली नाही. दरम्यान, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्यासह देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांनी हार्दीक पटेलांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. हार्दीक हे गेल्या दहा दिवसापासून उपोषण करीत असल्याने त्यांची प्रकृती खालावली असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते शक्तीसिंह गोहिल यांनी भाजप सरकारवर टीका केली असून पटेलांचे आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारने तातडीने विचार करण्याची गरज आहे. मात्र तसे होताना दिसत आहे. 

 

देवेगौडा यांनी हार्दीकच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी ट्विट केले असून या ट्विटवर तसे पत्रही प्रसिद्ध केले आहे. देवेगौडा यांनी म्हटले आहे, की मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली असून आपण स्वत: मध्यस्थी करावी. पाटीदार संघटनेचे हार्दीक हे तरूण नेते आहेत. त्यांच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. 

देवेगौडा यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासह तृणमुल कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनीही हार्दीक यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. 

संबंधित लेख