hamid ansari, new delhi | Sarkarnama

अन्सारी हे पूर्वी भारतीय होते, आता जातीयवादी झाले 

वृत्तसंस्था
रविवार, 13 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींनी केलेले वक्तव्य मुसलमान समाजातही ऐकणारे कोणी नाहीत. त्यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे. मुसलमानांनीही त्यांच्या वक्तव्याला विरोध केला आहे. अन्सारी हे पूर्वी भारतीय होते. आता ते जातीयवादी झाले आहेत अशी संघाचे नेते इंद्रेश कुमार यांनी येथे केली आहे 

राष्ट्रीय मुस्लिम मंचाच्या वतीने आयोजित राखी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात इंद्रेश कुमार बोलत होते. ते म्हणाले, "" अन्सारी यांना जेथे सुरक्षित वाटते अशा एखाद्या देशात त्यांनी गेले पाहिजे. ते पूर्वी सर्वपक्षीय नेते होते. पण ते आता कॉंग्रेसवादी झाले आहेत. गेल्या वर्षांत ते असुरक्षित नव्हते. पण आता त्यांना असुरक्षित वाटत आहे. त्यांनी अशा एका देशाचे नाव सांगावे जिथे मुसलमानांमध्ये असुरक्षततेची भावना आहे. मला वाटत नाही की, अन्सारींनी चिंता करण्याची गरज नाही. त्यांना कुठं सुरक्षित वाटते तिथे त्यांनी जों, असा माझा त्यांना सल्ला आहे. 

संबंधित लेख