haji sheikh joins bjp | Sarkarnama

आशिष शेलार यांनी शिवसेनेला दाखवला घाट! हाजी शेख थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 2 सप्टेंबर 2018

मुंबई : मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा शिवसेनेला चिमटा काढला आहे. शिवसेनेचे उपनेते हाजी अराफत शेख यांना अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्षपद सरकारने दिले. ते मिळाल्यानंतर ४८ तासांत शेख हे सेना सोडून भाजपमध्ये गेले. सेना नेत्यांना या साऱ्या घडामोडींचा पत्तादेखील नव्हता, हे विशेष

शेख हे मागील काही दिवसांपासून शिवसेना नेत्यांवर नाराज होते. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर शेख यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी रात्री वर्षा निवासस्थानी भेट घेऊन शेख यांनी पक्षात प्रवेश केला.

शेख यांनी शिवसेना वाहतूक सेनेची धुरा सांभाळली होती. शिवसेनेत येण्यापूर्वी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होते. यानंतर शिवसेनेत दाखल झाल्यानंतर त्यांनी काही कालावधीत शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपात प्रवेश केला आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत स्वबळाची तयारी करीत असताना भाजपा इनकमिंग सुरू ठेवले आहे .याचाच भाग म्हणून शेख यांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्याच्या बदल्यात अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद दिल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

भाजपा प्रवेश केल्यावर शेख यांनी म्हटले आहे की शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी प्रेम दिले मात्र अल्पसंख्याक समाजाला न्याय दिला नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाला न्याय दिल्याची भावना शेख यांनी व्यक्त केली. 

संबंधित लेख