भाजपला झटका; विनोद खन्नांच्या जागेवर कॉंग्रेसचा मोठा विजय ! 

भाजपला झटका; विनोद खन्नांच्या जागेवर कॉंग्रेसचा मोठा विजय ! 

गुरुदासपूर - पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांनी तब्बल 1,93,219 मतांनी विजय मिळवला असून, भाजपला मोठा झटका बसला आहे.

विनोद खन्ना यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणुक घेण्यात आली होती. भाजपने लोकसभेची ही जागा टिकवण्यासाठी स्वरण सलारिया यांना उमेदवारी दिली होती. तर, काँग्रेसने सुनील जाखड यांना आणि आम आदमी पक्षाने (आप) निवृत्त मेजर जनरल सुरेश खजुरिया यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत काँग्रेसने दीड लाखांहून अधिक फरकाने विजय मिळविला आहे. तर, आपच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

काँग्रेसने पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीत विजय मिळवीत सत्ता स्थापन केली होती. आता लोकसभा पोटनिवडणुकीत मिळविलेल्या विजयामुळे आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. दुसरीकडे भाजपला आपली जागा टिकवण्यात अपयश आल्याने मोठा झटका बसला आहे. 

काँग्रेस नेते नवज्योतसिंह सिद्धू यांनीही काँग्रेसच्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले आहे, की काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पंजाबने दिलेली ही दिवाळी भेट आहे. अकाली दल आणि भाजपला या निकालातून सणसणीत चपराक बसली आहे. हा नरेंद्र मोदी सरकारला इशारा असल्याचे वक्तव्य सुनील जाखड यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com