gurudas kamtha funeiral in chembur | Sarkarnama

गुरूदास कामत यांनी ज्या स्मशानभूमीचे उद्‌घाटन केले होते तेथेच अंत्यसंस्कार झाले 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मुंबई : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुरूदास कामत यांनी 2009 मधे चेंबूरमधील ज्या स्मशानभूमीचे उद्‌घाटन केले होते त्याच स्मशानभूती त्यांचा आज अत्यंविधी होत असल्याच्या आठवणीने त्यांच्या चाहत्यांना भावना अनावर झाल्या. 

कामत यांच्या पार्थिवावर या स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी कामत यांच्या निवासस्थानी त्यांचा पार्थिव देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळीच कामत यांचे अत्यंदर्शन घेत श्रध्दांजली वाहीली. यानंतर फडणवीस यांनी कामत यांच्या कुटूंबियाची भेट घेत सांत्वन केले. 

चेंबूर येथील स्मशानभूमीत कामत यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

म्हणजे कामत यांनी 2009 मधे ज्या स्मशानभूमीचे उद्‌घाटन केले होते त्याच स्मशानभूती त्यांचा अत्यंविधी होत असल्याच्या आठवणीने त्यांचे चाहते भावूक झाले होते.

संबंधित लेख