gulabrao patil about vikhe patil and devendra fadavnis relation | Sarkarnama

देवेंद्र फडणवीस आणि विखे पाटलांचे राजकीय अफेअर : गुलाबराव पाटील 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

नगर : कॉग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे अर्धे भाजपाचे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विखे पाटील यांच्यात राजकीय अफेअर आहे. मुख्यमंत्र्यांनी डोळा मारला की विखेंनी खाली बसायचे आणि मनातल्या मनात आय लव यू म्हणायचे असा प्रकार सुरु असल्याची टीका शिवेसना नेते, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. 

मंत्री पाटील यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विखे यांच्यावर टिकास्त्र सोडले. कॉग्रेस आता संपली असून, विखे यांनी स्वतःला गहाण ठेवले आहे, अशा शब्दांत त्यांनी समाचार घेतला. 

राष्ट्रवादी कॉग्रेस फक्त नगरमध्ये थोडीफार शिल्लक आहे. आमच्याकडे तर त्यांना खातेही उघडता आले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी व कॉग्रेसचेही आता काही शिल्लक नाही. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादीचा विषय संपला, असे गुलाबराव पाटील म्हणाले. 

संबंधित लेख