gulabrao patil about sujay vikhes loksabha ticket | Sarkarnama

मी स्टॅंपवर लिहून देतो, सुजय विखेंना भाजपचे तिकीट मिळणार : गुलाबराव पाटील 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

शिवसेना नेते आणि राज्याचे सहकारमंत्री गुलाबराव पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय हे भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हटले आहे. 

नगर : शिवसेना नेते आणि राज्याचे सहकारमंत्री गुलाबराव पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय हे भाजपमध्ये जाणार असल्याचे म्हटले आहे. 

आज नगर दौऱ्यावर असलेले गुलाबराव पाटील म्हणाले, विखे पाटलांच्या चिरंजीवांना खासदारकीचे तिकीट हवे आहे आणि ते भाजपकडून मिळणार आहे. कारण विखे भाजपात जाणार आहेत. डॉ. सुजय विखे यांना भाजपमधूनच तिकिट मिळेल, हे मी स्टॅम्पवर लिहून देतो. विखे पाटील हे आता विखे राहिले नसून, ते बिके झाले आहेत, असेही विखे पाटील म्हणाले. 

संबंधित लेख