GST Special Assembly session | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

जीएसटीसंदर्भात 17 मे रोजी विशेष अधिवेशन

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई - जीएसटीसंदर्भातील  विधेयकासह संबंधित इतर विधेयकांना मंजुरी देण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे विशेष अधिवेशन बुधवारी 17 मे 2017 रोजी घेण्यात येणार आहे.  यासंदर्भातील निर्णय मंगळवारी राज्य  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.                                    

मुंबई - जीएसटीसंदर्भातील  विधेयकासह संबंधित इतर विधेयकांना मंजुरी देण्यासाठी महाराष्ट्र विधानमंडळाचे विशेष अधिवेशन बुधवारी 17 मे 2017 रोजी घेण्यात येणार आहे.  यासंदर्भातील निर्णय मंगळवारी राज्य  मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.                                    

तसेच संबंधित विधेयके विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात ज्या दिवशी मंजूर होतील, त्या दिवसाचे सभागृहाचे कामकाज समाप्त झाल्यानंतर विशेष अधिवेशन संस्थगित करण्याबाबत राज्यपालांना शिफारस करण्यात येणार आहे. संसदेने केंद्रीय वस्तू व सेवा कर विधेयक (जीएसटी) तसेच एकात्मिक वस्तू व सेवा कर विधेयक संमत केले आहे. त्यास राष्ट्रपतींनी मंजूरी दिली आहे. या कायद्यांची अंमलबजावणी 1 जुलै 2017 पासून अपेक्षित आहे.

भारतीय संविधान अनुच्छेद 246 (क) मधील तरतुदीनुसार केंद्र व राज्यास वस्तू व सेवांवर कर लावण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्या अधिकारांतर्गत राज्याच्या विधानमंडळाने वस्तू व सेवा कर विषयक विधेयक (जीएसटी)मंजूर करून केंद्र सरकारकडे 31 मे पर्यंत पाठवावे असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने 17 मे चे  विशेष अधिवेशन घेण्यात येत आहे.

संबंधित लेख