ग्रामसेविकेच्या पुढाकाराने पाणीटंचाईवर मात

ग्रामसेविकेच्या पुढाकाराने पाणीटंचाईवर मात

गोपाळ शिंदे
घोटी (जि. नाशिक) पाणी टंचाई अंगवळणी पडलेल्या आदिवासी बांधवांची फरफट तालुक्यात पाचवीला पुजलेली असताना पाणी पुरवठा योजना ढिसाळ नियोजानाआभावी कायम चर्चेत राहिली आहे ,मात्र यास फाटा देत लोकसहभाग संपादित करत आवळखेड ग्रामपंचायत हद्दीतील जांभुळवाडी,चांदवाडी येथीलवाड्यांचा प्रश्न टँकर मुक्तीकडे वाटचाल करत आहे, आपल्या सततच्या विविध उपक्रमांनी प्रशिद्द असलेल्या ग्रामसेविका श्रीमती रुपाली जाधव यांच्या दुरष्टीने पाणी टंचाई कायम स्वरूपी निकाली निघणार असल्याचे आशादायक चित्र आत्ता दिसू लागले आहे.

धरणाचा तालुका म्हणून ख्याती पावलेला इगतपुरी तालुक्यात सद्यस्थितीत वाड्यावस्त्यांवरील आदिवासी नागरिक पाणी टंचाईने पूर्णता हैराण झाल्याचे दिसून येत असतांनाच, जनावरांना पाणी पाजण्यासाठी गावोगावी भटकंतीची वेळ आदिवासी बांधवावर आली आहे.

काराचीवाडी,जांभुळवाडी,पाण्यासाठी भटकंती करत असल्याचे वृत्त दैनिक सकाळमध्ये प्रशिद्ध झाल्यावर शासन खडबडून जागे झाले. या वृत्ताची दखल घेत तातडीने जांभुळवाडी लगत असलेल्या विहिरीचा गाळ काढून आडव्या बोअरचा वापर करण्यात आला, विहिरीला काळ्याभोर खडकातून प्रचंड प्रमाणात जागोजागी जिवंत पाण्याचे स्त्रोत्र लागल्याने खळखळणारे पाणी पाहून आदिवासी बांधवांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.

ग्रामसेविका श्रीमती जाधव यांनी लोकसहभाग व पेसा अंतर्गत निधी वापरत विहिरीची खोली वाढवण्याचे काम हाती घेतले सलग आठ दिवस ठाण मांडून काम मार्गी लावले.पुढील टप्यात लगेचच उर्वरित वा-याचीवाडी,काराचीवाडी येथील विहिरींचा देखील गाळ काढून बोअर मारण्यात येणार असल्याने चारही वाड्या टँकर मुक्तीकडे वाटचाल करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com