gowari got st status by highcourt | Sarkarnama

114 गोवारींच्या बलीदानाचे चीज झाले; 24 वर्षांनंतर मिळाला ST दर्जा 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

विदर्भात गेल्या 24 वर्षांपासून सुरू असलेल्या गोवारींच्या लढ्याला यश आले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोवारी हे आदिवासी असल्याचा निर्णय दिला आहे. यावेळी नागपुरात गोवारी बांधवांनी जल्लोष साजरा करायला सुरूवात केली आहे. 

नागपूर : विदर्भात गेल्या 24 वर्षांपासून सुरू असलेल्या गोवारींच्या लढ्याला यश आले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गोवारी हे आदिवासी असल्याचा निर्णय दिला आहे. यावेळी नागपुरात गोवारी बांधवांनी जल्लोष साजरा करायला सुरूवात केली आहे. 

विदर्भात मोठ्या प्रमाणावर गोवारी समाज आहे. या समाजाने अनुसूचित जमातीसाठी समावेश करावा, या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. याच मागणीसाठी 23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपुरात मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी राज्य विधिमंडळाचे नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होते. विदर्भातून शेकडो गोवारी बांधव मोर्चा काढण्यासाठी नागपुरात धडकले होते. या मोर्चाची राज्य सरकारने दखल घेतली नाही. त्यावेळी या लोकांनी तेथून जाण्यास नकार दिला. रात्र झाल्यानंतरही गोवारी समाज निघून गेला नाही. त्यामुळे हा समाज संतप्त झाला. संतप्त समाजाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सायंकाळी लाठीमार सुरू केला. यामुळे झालेल्या चेंगराचेंगरी 114 गोवारी मृत्यूमुखी पडले. या घटनेने राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव टाकला. या घटनेनंतर केवळ सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. युती सरकारनेसुद्धा गोवारी समाजाला कोणताही फायदा मिळवून दिला नाही. त्यांचा हा संघर्ष सुरू होता. 

आदिम गोवारी समाज विकास मंडळाने ही याचिका दाखल केली होती. या संघटनेने गोवारी समाजाला आदिवासी घोषित करावे व गोवारी समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने गोवारी आदिवासी असल्याच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे गेल्या 24 वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला न्याय मिळाला आहे. 

संबंधित लेख