this govt will go acccidently : vikhe | Sarkarnama

अपघाताने आलेले सरकार अपघाताने जाणार : विखे पाटील

उमेश घोंगडे
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

पुणे : राज्यात सत्तेत आलेले भारतीय जनता पार्टीचे सरकार केवळ अपघाताने सत्तेत आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाला सुरवात करताना झालेला अपघात हा या सरकारच्या काम करण्याच्या पद्धतीचा परिणाम आहे. हे सरकार अशाच पद्धतीने काम करीत राहिल्यास अपघाताने आलेले हे सरकारने अपघातानेच जाणार आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज केली. 

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाला आज सुरवात होणार होती. या कामासाठी जाणाऱ्या बोटींपैकी एक बोट बुडाली सुदैवाने बोटीतील सारे बचावले. मात्र कामाची सुरवात करण्यासाठी जाताना झालेल्या अपघातामुळे एकच खळबळ उडाली.

या संदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. "सरकारनामा'शी बोलताना ते म्हणाले, "" राज्यातील सरकार कोणतेही काम धड करत नाही. प्रत्येक कामात अडथळे आणि अडचणी येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे कामाची सुरवात करतानादेखील यांनी योग्य काळजी घेता आली नाही. मुळात हे सरकार अपघाताने सत्तेत आले आहे. त्यामुळे सरकारकडून जनतेची योग्य कामे होत नाहीत. अपघाताने आलेले हे सरकार अपघातानेच जाणार आहे.'' 

मुंबईत शिवस्मारकाच्या कामाला आज सुरवात करण्यात येणार होती. त्यासाठी स्मारक उभारण्याच्या ठिकाणी समुद्रात अभियंते, कर्मचारी, आधिकारी व पत्रकार वेगवेगळ्या बोटीने गेले होते. मात्र यातील एक बोट पाण्यात बुडली. बराच गोंधळ उडाला. जवळच दुसरी बोट असल्याने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही. मात्र या सर्व गोंधळामुळे आज काम सुरू करता आले नाही. स्मारकाच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. आज प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार होते. "राज्य सरकारने या कामाची सुरवात करताना पुरेशी काळजी व योग्य नियोजन करण्याची भरज असल्याचे विख-पाटील यांनी सांगितले

संबंधित लेख