govind wani attack by anil gote supporters in dhule | Sarkarnama

अनिल गोटे समर्थकांनी माजी नगराध्यक्षांची गाडी फोडली

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

पैसे वाटपाच्या संशयावरून प्रकार झाल्याची चर्चा आहे. 

धुळे : महापालिका निवडणुकीला आज हिंसक वळण लागले. 

भाजपचा प्रचार करणारे पारोळ्याचे (जि. जळगाव) माजी नगराध्यक्ष गोविंद वाणी यांच्यावर आमदार अनिल गोटे समर्थकांनी हल्ला केला. हल्ल्यात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. समर्थक उमेदवार दिलीप साळुंखे आणि सहका-यांवरील कारवाई मागे घेण्यासाठी आमदार गोटे यांचे देवपूर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. निवडणुकीत पैसे वाटपाच्या संशयावरून प्रकार झाल्याची चर्चा आहे. 

संबंधित लेख