Government will take strict action : Fadnavis | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

शेतकऱ्यांच्या नावावर  तूर विकल्यास कारवाई : मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 30 एप्रिल 2017

जेवढी तूर आघाडी शासनाने पंधरा वर्षांच्या कार्यकाळात खरेदी केली नाही. तेवढी तूर विद्यमान सरकारने केवळ या वर्षी खरेदी केल्याचा दावा फडणवीस यांनी केला.

नागपूर :  नाफेड व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेली सर्व तूर राज्य सरकार खरेदी करेल, शेतकऱ्यांनी याची काळजी करू नये. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे आहे. मात्र शेतकऱ्यांच्या नावावर तूर विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यांची गय करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिला.  

नागपुरात आले असता ते एका कार्यक्रमात बोलत होते. तूर खरेदीवरून विरोधक राजकारण करीत असून त्यांच्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. आघाडी सरकारच्या कार्यकाळात तुरीचे जेवढी उत्पादन झाले  त्याचे त्यांना नियोजन करता आले नव्हते. मात्र गेल्या पंधरा वर्षांत यंदा राज्यात प्रथमच विक्रमी  तुरीचे  उत्पादन झाले आहे. जेवढी तूर आघाडी शासनाने पंधरा वर्षांच्या कार्यकाळात खरेदी केली नाही. तेवढी तूर विद्यमान सरकारने केवळ या वर्षी खरेदी केल्याचा दावा फडणवीस यांनी केला. खरेदी केंद्रावरील शेवटच्या दाण्यापर्यंत तूर खरेदी करण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत तुरीचा प्रश्‍न पूर्णपणे मार्गी लावला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

 
 

संबंधित लेख