government officer's transfer scam : police submit 4700 paged chargesheet | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

बदली गैरव्यवहारप्रकरणी  4,700 पानांचे आरोपपत्र !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई  :  गैरमार्गाने अधिक पैसे कमावण्याची संधी असलेल्या ठिकाणी बदली करून देण्याप्रकरणी गुन्हे शाखेने बुधवारी (ता. 23) सात आरोपींविरुद्ध 4 हजार 700 पानांचे आरोपपत्र दाखल केले. 

पोलिसांनी या प्रकरणात रवींद्र मोहब्बतसिंग यादव ऊर्फ शर्मा (वय 51), किशोर गोविंद माळी (38), विशाल पांडुरंग ओंबळे (40), विद्यासागर माणिकराव हिरमुखे (47), कमलेश रमेश कानडे (29), चंद्रकांत ऊर्फ रितेश भय्याजी राखुंडे आणि बंदनवाज अजमुद्दीन मणेर (29) या सात जणांना अटक केली होती. 

या प्रकरणातील तक्रारदार असलेले पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण यांना माळी याने मुंबई किंवा मुंबईच्या आसपासच्या परिसरात बदली करून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर माळी याने त्यांच्याशी संपर्क साधून सांताक्रूझ येथील हॉटेलमध्ये भेटायला बोलावले होते. चव्हाण यांना संशय आल्याने त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखेमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. 

पोलिसांनी हॉटेलमध्ये छापा घालून माळी, हिरमुखे, ओंबळे आणि शर्मा यांना अटक केली. हॉटेलमधील खोलीत पाच कोटींचे दोन आणि नाव न लिहिलेला 40 लाखांचा धनादेश, अशोकस्तंभ असलेले रवींद्रसिंग याच्या नावाचे व्हिजिटिंग कार्ड, आक्षेपार्ह कागदपत्रे आदी सापडले होते. काही आयपीएस अधिकाऱ्यांनी बदलीसाठी संपर्क साधला होता, अशी माहिती आरोपींनी चौकशीवेळी दिली होती. 

संबंधित लेख