Government officers to go on leave for % day week | Sarkarnama

पाच दिवसांच्या आठवड्यासाठी शासकीय अधिकारी नैमित्तीक रजेवर जाणार 

सरकारनामा
सोमवार, 24 डिसेंबर 2018

.

मुंबई  : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा आणि सेवानिवृत्तीचे वय 60 करण्याच्या मागण्यांसाठी राज्य सरकारकारचे दीड लाख राजपत्रित अधिकारी येत्या 5 जानेवारीपासून सामुहिक नैमित्तीक  रजेवर जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे.

राज्य सराकारी कर्मचाऱ्यांना सातवे वेतन आयोग लागू करतानाच पाच दिवसांचा आठवडा आणि सेवानिवत्तीचे वय 60 करण्याची मागणी महासंघाने केली आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पाच दिवसांचा आठवड्यासाठी कामाच्या प्रत्येक दिवशी 45 मिनिटे अधिक काम करण्याची तयारी महासंघाने दाखविली आहे. तसेच 7 व्या वेतन आयोगाप्रमाण वेतनवाढीबरोबरच घरभाडे व अन्य भत्तेही केंद्राप्रमाणे असावेत अशी मागणी करण्यात आली आहे

संबंधित लेख